Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

माणिकपुंज धरण भरले ; नांदगाव शहराचा व परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला

Share

नांदगाव।प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणे ओसंडून वाहत असताना नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण अखेर ओव्हरफ्लो  झाल्याने नांदगाव शहराचा व परिसरातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने माणिकपुंज धरण भरल्याने या भागातील शेतकऱ्यांचा अशा पलवित झाल्या आहेत.नांदगाव तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्याने दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने माणिकपुंज धरणाची ३३५ दशलक्ष घनफूट एवढी या धरणाची साठवण क्षमता आहे.

जुन ते सष्टेबरच्या पहिल्या आठवड्यात मृतसाठा शिल्लक होता.गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने माणिकपुंज ओव्हरफ्लो झाले आहे.यावेळी माणिकपुंज धरण भरण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागली. कारण माणिकपुंज धरण हे जुलै महिन्यातच भरणारे धरण म्हणून ओळख निर्माणझाली आहे.

धरणाचे पाणी पाणी जळगांव बुद्रुक,कासारी ,बाणगांव,कसाबखेडा,जळगांव खुर्द,हिगणेदेहरे, आदी गावांमध्ये सिचनासाठी उपयुक्त ठरले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!