Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमालेगाव शहरात केंद्रीय राखीव पोलीस दलाची नेमणूक करा- माजी आमदार दिपिका चव्हाण

मालेगाव शहरात केंद्रीय राखीव पोलीस दलाची नेमणूक करा- माजी आमदार दिपिका चव्हाण

प्रतिनिधी। डांगसौंदाने

जिल्ह्यातील मालेगाव शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मालेगाव करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. इथे रोजच मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्ण सापडत असल्याने सर्वसामान्य मालेगाव करांचे जगणे असहाय्य बनले आहे. येथील जनता स्थानिक पोलिसांना जुमानत नसल्याने मालेगाव सह सटाणा, नांदगाव ,देवळा, कळवण ,आदी तालुक्यांत करोना चा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

माझा मतदारसंघ असलेल्या बागलाण मधील सटाणा शहरात करोनाचा रुग्ण सापडल्याने स्थानिक जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलीस स्टेशनचे आहेत ते कर्मचारी मालेगावी बंदोबस्ता साठी जात असल्याने स्थानिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. यातच बाहेरील तालुक्यातील पोलीस ड्युटी साठी मालेगावी जात असल्याने यामधील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना करोणाची लागन झाल्याने पोलिसांच्या कुटुंबियांसह त्यांच्या संपर्कातील अनेकांना करोनाची लागण झाली आहे.

अशा परिस्थितीत मालेगाव शहरातील करोनाच्या नियंत्रणासाठी केंद्रीय राखीव दल (crpf) अथवा राज्य राखीव दल(srpf) मोठ्या संख्येने तैनात करून मालेगाव मधून विनाकारण बाहेर पडत करोना पसरविणाऱ्यांवर कड़क कार्यवाही करणेसाठी उपरोक्त दलांना पाचारण करण्यात यावे.व जिल्ह्यातील इतरत्र तालुक्यातील पोलिस यंत्रणा ही नियुक्तीच्या ठिकाणी पूर्णवेळ थांबण्यास मदत होईल अन्यथा पोलीसच करोनाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर सापडून मोठी समस्या निर्माण होईल तसेच बागलाण तालुक्यातील १७१ गावांसाठी असलेले पोलीस बळ हे अत्यंत तोड़के असून बागलाण मधील सटाणा व जायखेड़ा पोलीस ठाणे मधे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविन्याची मागणी ही माजी आमदार चव्हाण यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या