Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमालेगावातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना तांदुळासोबत चणाडाळीचे मोफत वितरण

मालेगावातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना तांदुळासोबत चणाडाळीचे मोफत वितरण

मालेगाव । प्रतिनिधी

धान्य वितरण अधिकारी, मालेगाव यांच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थी या कार्डधारकांना मोफत तांदुळ व चणाडाळीचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मे या महिन्यात ई-पॉस मधील सदस्यानुसार प्रति सदस्य ५ किलो तांदुळ व प्रति कार्ड 1 किलो चणाडाळीचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. धान्य वितरण अधिकारी, मालेगाव कार्यक्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत 21 मे, 2020 पासून याचे वितरण करण्यात येणार असल्याचे धान्य वितरण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानात एकाचवेळी गर्दी करु नये. येतांना चणाडाळ घेण्यासाठी स्वतंत्र पिशवी सोबत आणावी. कुटूंबातील एकाच सदस्याने धान्य घेण्यासाठी दुकानात यावे. येतांना चेहऱ्यावर मास्क अथवा रुमाल बांधावा. स्वस्त धान्य दुकानासमोर सुरक्षीत अंतर राखण्यासाठी 1मीटरच्या अंतराने रांगेत उभे रहावे अशा सुचनाही यात नमूद करण्यात आल्या आहेत.

त्याच बरोबर स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत धान्य कमी देणे, जादा रकमेची आकारणी करणे, धान्य खरेदीची पावती न देणे आदि बाबतीत नागरिकांच्या काही समस्या, तक्रारी असल्यास पुरवठा निरीक्षकांशी संपर्क साधावा. शहरातील भाग निहाय पुरवठा निरीक्षकांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे.

कॅम्प व संगमेश्वर परिसरासाठी पी.बी.मोरे, भ्रमणध्वनी क्रं. 9764185855/ 9284228647,

नवापुरा भागासाठी आर.रामाघरे, भ्रमणध्वनी क्रं. 9823900279/ 9511715192,

ईस्लामपुरा भागासाठी एस.एस.शिंदे, भ्रमणध्वनी क्रं. 7620681029/ 8888258123.

असे असून याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या