Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमहिंद्रा अँड महिंद्राच्या उत्पादनाला दोन दिवसात मिळणार गती

महिंद्रा अँड महिंद्राच्या उत्पादनाला दोन दिवसात मिळणार गती

छोटे उद्योग व वाहतूकदारांमध्ये उत्साह

सातपूर । प्रतिनिधी

- Advertisement -

महिंद्रा उद्योगसमूहाने आपल्या स्कॉर्पिओ उत्पादनाचा प्रयत्न पहिल्या टप्प्यात केला असून, काही छोट्या भागांचा तुटवडा पडत असल्याने येत्या एक-दोन दिवसात उत्पादन पूर्ण गतीने सुरू होईल असा विश्वास व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला.

महिंद्रा उद्योगसमूहाच्या सर्वच उत्पादन स्थळांवर काम वेगाने सुरू झाले असून, नाशिक उद्योगातही काल सुमारे पाचशे ते सहाशे कामगारांनी हजेरी लावली आहे. दोन दिवसांपूर्वी महिंद्रामध्ये २५ स्कॉर्पिओ वाहनाचे उत्पादन करण्यात आले होते. मात्र सुट्या भागांची त्रुटी लक्षात येतात येत्या दोन दिवसात त्यांची पूर्तता करून पूर्ण क्षमतेने सर्व लाईनवर काम सुरू करण्यात येणार असल्याचे नाशिक महिंद्रा चे उपाध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सांगितले.

गेले काही दिवसांपासून महेंद्रा कंपनी मध्ये उत्पादन स्थळांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. कच्च्या मालाच्या मागणीची नोंदणीही करण्यात आली. त्यादृष्टीने लघु मध्यम उद्योगांना मालाची मागणी नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत काही ठिकाणच्या उत्पादनांची कमतरता पडत असल्याने उत्पादनाला गती घेता येत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू केले जाणार असून, पहिल्या टप्प्यात स्कॉर्पिओ व एक्सयुव्ही ३०० या वाहनांच्या उत्पादनाना गती दिली जाणार असल्याचे समजते.

औद्योगिक क्षेत्रात संचारला उत्साह

औद्योगिक क्षेत्रातील ऑटो उद्योगासाठी छोटे-छोटे भाग बनवणारे सुमारे तीनशे ते साडेतीनशे उद्योग महिंद्रा कंपनी वर अवलंबून आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा च्या उत्पादनाला सुरुवात झाली तर, या उद्योगांना गती मिळत असल्याने महिंद्रा च्या उत्पादनाची तयारी त्यांच्यासाठी उत्साह निर्माण करणारी आहे. त्यामुळे छोट्या लघु-मध्यम उद्योगांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण दिसून येत असून, सर्वच ठिकाणी सुट्या भागांची तयारी गतिमान करण्यात आली आहे. अनेक छोट्या उद्योगांकडे सुट्टे भाग तयार असल्याने त्या भागांची पुरवठा करण्यासाठी ची पॅकिंगचे काम सुरु झाले आहे.

मालवाहतूक दारांमध्येही उत्साह
उद्योगांना लागणाऱ्या कच्चामाल व झालेला तयार मला ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहनांची गरज लागत असते.गेल्या ४०-५० दिवसांपासून उद्योग क्षेत्र ठप्प झाल्याने वाहन चालकांची अडचण निर्माण झाली होती मात्र एकट्या महिंद्राच्या उत्पादन प्रक्रिया गतिमान झाल्यामुळे ट्रान्सपोर्ट उद्योगांनाही गती मिळनार आहे शहरांतर्गत कच्च्या व तयार मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांना विशेष मागणी दिसून येऊ लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या