Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

उच्चदाब वीज ग्राहकांसाठी ‘केव्हीएएच’ बिलिंग

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

महावितरणच्या उच्चदाब व २० किलोवॅटवरील औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी पुढील काळात किलोव्होल्ट अ‍ॅम्पियर अवर बिलिंग प्रणाली प्रस्तावित करण्यात आली असून दि. १ एप्रिल २०२० पासून सुरू होणार्‍या या प्रणालीसाठी तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी अनुरूप असलेले मीटर लावण्याची पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया नाशिक शहर मंडळ अंतर्गत सुरू झाली आहे. यामध्ये ३ हजार ६२८  वीज मीटर बदलण्यात येणार आहेत.

उच्चदाब आणि २० किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांसाठी सोयीच्या असलेल्या किलो व्होल्ट अ‍ॅम्पियर बिलिंग प्रणालीचा मुख्य उद्देश हा ग्राहकांनी पॉवर फॅक्टर १ ठेवावा, जेणेकरून वितरण हानी कमी होईल व विजेचा दर्जा वाढून उच्चत्तम गुणवत्तेची वीज मिळेल हा आहे.

या प्रणालीत जास्त रिअ‍ॅक्टीव्ह पॉवर वापरणार्‍या ग्राहकांना जास्त बिल भरावे लागणार असल्याने ग्राहकांना कमीत कमी रिअ‍ॅक्टीव्ह पॉवर वापरण्यासाठी ही प्रणाली प्रोत्साहीत करणारी आहे. याशिवाय या प्रणालीत प्रोत्साहन व दंड शुल्क वेगळी लावण्याची गरज नाही.

ग्राहकांसाठी संपूर्णपणे नवीन असलेल्या या प्रणालीबाबत ग्राहकांना माहिती देण्यासाठी महावितरणच्या वतीने राज्यभर मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात येऊन यामध्ये या बिलिंग प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली होती. यावेळी उपस्थित ग्राहकांच्या प्रश्‍नांचे उत्तरे देऊन शंकाचे निरसनही करण्यात आले होते.

त्यामुळे नाशिक शहर मंडळात एजन्सी नेमण्यात येऊन या प्रणालीकरिता अनुरूप विद्युत मीटर लावण्याची प्रकिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात 30 ऑक्टोबरपर्यंत मीटर बदलण्यात येणार आहेत. तरी संबंधित ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!