Type to search

Featured नाशिक

शहरातील ८०० रोहित्र होणार स्वच्छ

Share
नाशिकरोड | प्रतिनिधी
महावितरणकडून शहरातील रोहित्रांची (डीपी) स्वच्छता करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात ही मोहीम हाती घेण्यात आली असून महावितरणच्या कर्मचार्‍यांसह कुशल कामगार व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या मदतीने जवळपास ८०० रोहित्रांची स्वच्छता करण्यात येत आहे.
रोहित्रांच्या भोवती वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्या आदी काढून टाकण्याची मोहीम दरवर्षी महावितरणकडून पावसाळापूर्व कामांमध्ये राबविण्यात येते. जेणेकरून रोहित्र परिसरात अपघात होणार नाहीत व परिसरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळेल.
याशिवाय जवळपासच्या नागरिकांनी रोहित्राच्या संरक्षण जाळीतून आतमध्ये टाकलेला कचराही दूर केला जातो. निविदा काढून जाणकार कामगारांच्या मदतीने लाईनस्टाफ़कडून झाडांच्या फांद्या व वेली हटविल्या जातात.
यावर्षी प्रथमच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना शहरातील रोहित्र स्वच्छतेच्या कामांमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. शहरातील ८०० रोहित्रांच्या साफसफाईचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आतापर्यंत जवळपास ७० टक्के काम पूर्ण होत आले आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना केवळ रोहित्र परिसराच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
जिओ कॉर्डीनेटद्वारे या मोहिमेची पडताळणीही करण्यात येत आहे. रोहित्र संचलनासाठीच्या यंत्रणांचे लोखंडी झाकण गायब असलेल्या ठिकाणी नवीन झाकणे बसविण्यात येत आहेत. बसविलेली झाकणे किरकोळ आमिषासाठी धोका पत्करून काढून नेली जातात. रोहित्र परिसरातील व मिनी पिलरचे झाकण काढून नेऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
रोहित्राजवळ कचरा टाकू नका
महावितरणच्या रोहित्राजवळ कचरा व उरलेले अन्न मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असल्याचे स्वच्छता मोहिमेत समोर आले आहे. कचरा नष्ट करण्यासाठी लावण्यात येणार्‍या आगीमुळे रोहित्र बाधित होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे रोहित्राजवळ कचरा व उरलेले अन्न टाकू नका, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर आणि अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!