Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहाराजस्व अभियान : ४२ शाळांमध्ये १७ हजार शैक्षणिक दाखल्यांचे वितरण

महाराजस्व अभियान : ४२ शाळांमध्ये १७ हजार शैक्षणिक दाखल्यांचे वितरण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक तालुक्यात महाराजस्व अभियानाअंतर्गत ४२ शाळांमध्ये १७ हजार ४२५ दाखल्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. तसेच, समाधान शिबिराद्वारे रेशनकार्ड, संजय गांधी निराधारचा योजनांंचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे. पुढील काळात महाराजस्व अभियान विविध तालुक्यात मंडळ स्तरावर आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचे कामे त्यांच्या गावातच होणार असून त्यांना जिल्ंहाधिकारी कार्यालयाच्या खेट्या मारण्याची गरज भासणार नाही.

- Advertisement -

शासनाकडून विविध प्रवर्गासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, या योजनांंचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवास पुरावा, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्रासह विविध प्रमाणपत्रांची गरज भासते. दाखले काढण्यासाठी साहजिकच विद्यार्थी व पालकांना तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागतात. शिवाय अ‍ॅडमिशन प्रक्रियेचा ठाराविक महिन्यांमध्ये दाखले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडते. साहजिकच त्यांचा संंबंधित यंत्रणेवर ताण येतो.

यातून तोडगा काढण्यासाठी शासनाच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत जाऊनच दाखले वितरणास सुरुवात केली आहे. त्यानुसार तालुक्यातील ५६ पैकी ३५ शाळा आणि शहरातील ७ अशा ४२ शाळांत जाऊन १७ हजारांवर दाखले वितरित झाली आहे. अजूनही त्याचे वितरण सुरु असल्याने त्यात वाढ होणार आहे.

तसेच, समाधान शिबिरे हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रमही शासन राबवत असून, तालुक्यात महसूलसोबतच आरोग्य विभाग, कृषी, ग्रामपंचायत या सर्व विभागांच्या समन्वयातून सर्व सेवा एकाच छताखाली दिल्या जात आहे. त्याअंतर्गत रेशनकार्ड नवीन देणे, नाव कमी अथवा समाविष्ट करणे, दुबार कार्ड कमी करणे, संजय गांधी निराधारची प्रकरणे जागेवरच मंजूर करणे, सातबारा उतार्‍यातील किरकोळ दुरुस्ती करणे, अशी अनेक काम केली जात आहेत. त्यामुळे नागरिकही याबाबत समाधान व्यक्त करत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील एकलहरे, शिंदे-पळसे, गिरणारे तसेच शहरात गंगापूररोड परिसर, पाथर्डी फाटा परिसरात ही शिबिरे घेण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसह नागरिकांना या अभियानाचा खूप फायदा झाला आहे. त्यांच्या गावात किंवा शाळेतच त्यांना दाखल्यांसह इतरही समस्या सोडविल्या जात असल्याने त्यांच्याही मनात समाधान आहे. चार-पाच समाधान शिबिरे घेतली, त्यात जागेवर रेशनकार्ड आणि वयाचे पुरावे दिले. १ हजारवर वयाचे पुरावे दिले आहेत.
– अनिल दौंडे, तहसीलदार नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या