Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनांदूरमध्यमेश्वर : मांजरगावला देशी दारू विक्रीचा प्रयत्न महिलांनी उधळला

नांदूरमध्यमेश्वर : मांजरगावला देशी दारू विक्रीचा प्रयत्न महिलांनी उधळला

दुकानालाही ठोकले टाळे

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यनजिक असलेल्या मांजरगाव येथील देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा विरोध असतांनाही ते उघडण्याचा दुकान मालकाचा प्रयत्न तेथील महिलांनी हाणुन पाडला आणि त्या दुकानाला टाळे ठोकल्याने त्याची परिसरात एकच जोरदार चर्चा आहे.

मांजरगाव येथे जय मल्हार हॉटेलला देशी दारू विक्रीचा परवाना असला तरी दुकान मालकाने ग्रामसभेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने हे दुकान सुरु करण्यास परवानगी देवू नये अशा आशयाचे निवेदन मांजरगावचे सरपंच पंडित आनंदा सोनवणे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी ,निफाड तालुक्याचे आमदार दिलीपकाका बनकर, सायखेड़ा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच तहसीलदार यांना पाठविले होते.

त्या निवेदनावर दोनशे ग्रामस्थांनी सह्या केल्या असून कायमस्वरूपी हे दुकान बंद करण्याचा निर्धार केला आहे. या दुकानाचा आजूबाजूच्या लोकांना आणि पर्यटकांना त्रास होतो असे निवेदनात नमूद केल्यानंतरही दुकानदार याने दुकान उघडून अनाधिकृतरित्या देशी दारुची विक्री चालू केल्याचे कळताच संतप्त महिलांनी या दुकानाला टाळे ठोकले.

देशी दारुची विक्री कायमस्वरूपी बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू,असा इशारा सरपंच पंडित सोनवणे, उपसरपंच मंदा बारकू दौंड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व सर्व महिलांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या