Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदोन बछडयांसह बिबट्याचे दर्शन

दोन बछडयांसह बिबट्याचे दर्शन

शेळी फस्त, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शेनीत | त्र्यंबक जाधव

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील  पिंपळगाव डुकरा या गावात गेल्या आठ दिवसात पासून गावाच्या परिसरात बिबट्या मादीचे दर्शन होवु लागल्याने ग्रामस्थांना मध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले असून या मादीला वनविभागाने पिंजरा लावून पकडून न्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गावच्या दक्षिण दक्षिण बाजूला श्री. बाळासाहेब दत्तू झनकर आणि श्री. नथू सखाराम झनकर यांचे घर असून त्या घराच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात बिबट्या मादीचे दर्शन घडून आले असून नेहमीच तिचा ओरडण्याचा आवाज ग्रामस्थांना ऐकायला मिळतात,

या शेताजवळच अरुणाबाई कोकाटे यांची वस्ती आहे, या बिबट्या मादीने त्यांच्या शेळीवर हल्ला करून फस्त केले. हातावर पोट असलेल्या अशा लोकांना वनविभाकडून आर्थिक मदत मिळावी ही मागणी गावकरी करत आहे.

प्रत्यक्ष दर्शी लोकांच्या सांगण्यानुसार बिबट्या मादी सोबत दोन बछडे आहे. ती भुकेली असून तिला भक्ष्य न मिळाल्यास ती वस्तीतील लोकांवरही हल्ला करू शकते. त्यामुळे गावात व शेतावर राहणाऱ्या शेतकऱ्यानं मध्ये भीती निर्माण झाली असून शेती कामासाठी बाहेर कसे पडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिसरात ऊस शेतीव जवळच कडवा धरण शेत्रात परिसरात बिबट्याला लपण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्याचा या परिसरात कायमच वावर असतो.या मादीला वनविभागाने पिंजरा लावून पकडून न्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या