Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

‘कस्तुरबा’ पुस्तकाने तरुणपिढी समृद्ध होईल : राजन

Share

नाशिक । प्रतिनिधी

तरुणपिढीला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींच्या जीवनाबद्दल आज फारशी माहिती नाही. ही सर्व माहिती प्रा. सोर यांच्या ‘कस्तुरबा’ पुस्तकातून होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी अन्वर राजन यांनी केले. ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर लिखित कस्तुरबा पुस्तकाचे प्रकाशन राजन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

महात्मा गांधी यांच्याबद्दल आतापर्यंत विस्तृत लेखन झाले आहे. त्यातून वास्तवातील महात्मा गांधी समजावून घेणे सोपे आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्याची कास धरण्याच्या तत्त्वाचा अंगीकार करणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या विपुल साहित्याचा उपयोग होईलच, पण त्यांची सहधर्म चारिणी असलेल्या कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल प्रा. सोर यांच्या पुस्तकातून समजावून घेता येईल, असेही अन्वर राजन यांनी स्पष्ट केले.

यानंतर प्रा. वासंती सोर म्हणाल्या की, कस्तुरबा गांधींबद्दल फारच कमी लिहिले गेले आहे. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल लिहावे, हा विचार आला. त्यात गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त पुस्तक लिहिण्याचे पक्के केले. कस्तुरबांच्या भूमिकेत जाऊन हे पुस्तक लिहावे असे विचारांती ठरविले. आज कस्तुरबा पुस्तक प्रसिद्ध होण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!