Saturday, April 27, 2024
Homeनाशिककळवण : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

कळवण : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

पुनदखोरे | वार्ताहर

कळवण तालुक्यातील रवळजी येथे रवालची दरी परीसरात आज रात्री एका बिबट्याने शेळी वर हल्ला करून ठार मारल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे .रवळजी येथील शेतकरी अमृता वामन जाधव यांचे शेत असुन तेथेच घराशेजारी शेळी व गुरे बांधलेली होती रात्री २ वाजेच्या सुमारास बिबटयाने त्यांच्यावर हल्ला करीत एक शेळी फस्त केली . या संदर्भात शेतकरी जाधव यांनी परिसरातील शेतकऱ्यांना माहिती दिली .

- Advertisement -

शेजारील शेतकऱ्यांनी वन विभाग , कळवण यांना याबाबत माहिती देऊनही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कोणीही घटनास्थळी हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान तालुक्यात शेतकऱ्यांनी कांदा पिक जास्त प्रमाणात लावले असुन रात्रीच्या वेळी लाईट असल्यामुळे कांदयांना पाणी दयावे लागते . उन्हाळ्याची चाहुल लागत असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात फिरत असतात , यामुळे शेतकऱ्यांना जीव  मुठीत धरून शेतात कामे करावी लागत आहेत . वन विभागाने तात्काळ बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे

रवळजी येथील धाकल दरी ,खालची दरी परीसरात बऱ्याच वेळी बिबटया सह तिन बछड्यांचे  दर्शन झाले असुन , वेळोवेळी वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली आहे .परंतु वन विभाग याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे . याबाबत कोणतीही जिवीत हानी झाल्यास यास सर्वसी जबाबदार वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात येईल . तरी परीसरात तात्काळ पिंजरा लावावा  बबन वाघ , शेतकरी रवळजी

- Advertisment -

ताज्या बातम्या