Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कळवण : मानूर येथे करोना संशयित रुग्ण आढळला

Share

पुनदखोरे ।  वार्ताहर

कळवण तालुक्यातील मानूर येथे, करोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. संशयित रुग्ण ७ मार्च रोजी दुबईहुन कळवण (मानूर) येथे परत आला होता. त्यास १३ मार्च रोजी घशाचा त्रास जाणवला. पंरतु त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर १४ मार्च रोजी त्यास खोकला येण्यास सुरुवात झाल्याने १५ मार्च रोजी त्याने कळवण उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी केली.

वरील लक्षणांवरून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची रक्ताची तपासणी केली असता त्यास तत्काळ नासिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्रीपर्यत त्या संशयीत रुग्णाचा अहवाल कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राप्त झालेला नव्हता.

प्रांंताधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच तहसीलदार कापसे यांनी खबरदारी पाळण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे. दरम्यान, पुढील महिन्यात  सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सवावार करोनाचे सावट असून उद्या (१६ मार्च) रोजी होणार्‍या शासकीय अधिकार्‍याच्यां बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!