Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

अभोणा ग्रामसभा अस्वच्छतेवरुन गाजली; प्लॅस्टिक न वापरण्याची ग्रामस्थांनी घेतली शपथ

Share

अभोणा । वार्ताहर
कळवण तालुक्यातील अभोणा येथील ग्रामसभा अस्वच्छेतवरुन गाजली आहे. या ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व एका सदस्या व्यतिरीक्त इतर सर्व गैरहजर राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. देशभर स्वच्छतेचा जागर केला जात आहे.मात्र, अद्याप प्लॅस्टिक पिशव्या व इतर वस्तुंचा वापर सर्रास होत असल्याने सर्वांसाठी घातक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशान्वये ‘स्वच्छता हिच सेवा २०१९’ अभियानांतर्गत प्लॅस्टिक मुक्त ग्रामपंचायत, प्लॅस्टिक संकलन व श्रमदान याविषयी जनजागृती करण्यासाठी ग्रामपालिकेत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

संपर्क अधिकारी डी.ई. खराटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ग्रामसभा झाली. त्यावेळी उपस्थितांना प्लॅस्टिक पिशव्या व इतर वस्तु न वापरण्याची शपथ देण्यात आली. संतप्त झालेल्या नागरिकांनी समस्या मांडल्या. तेव्हा गणपत दुसाने यांनी अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले. शुक्रवारी गावात भरणार्‍या आठवडे बाजारातील विक्रेते उरलेला व सडका भाजीपाला तसेच प्लॅस्टिक कागदांचा खच करून जात असल्याने नागरिकांना त्रास होतो. बाजार आटोपल्यावर सायंकाळी साफसफाई करण्यात यावी अशी मागणी केली.

गावातील कचरा ठिकठिकाणी पेटवून प्लॅस्टिककच्या विषारी धूराने गावकर्‍यांना आजारी पाडण्याचे धंदे त्वरीत बंद करावेत अशी मागणी पद्मभूषण शहा यांनी केली. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव, सरपंच मिराबाई पवार, उपसरपंच ताराबाई पवार, मुख्याध्यापक दौलत साबळे, डी.बी.शिंदे, साहेबराव बहिरम, सुरेश येवला, किरण सुर्यवंशी, अनिल माळेकर, माधुरी अभंग, ज्योती जाधव, अरूणा महाले, हिराबाई आहेरराव, कल्पना पाटील, लता जगताप, निर्मला राजभोज, शरद पवार, बाबुराव पवार, डी.आर.ठाकरे, जितेंद्र आहेर, राजेंद्र गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वच्छता हिच सेवा’ या अंतर्गत दि.११ सप्टेंबर ते दि.२ आक्टोंबर या कालावधीत प्लॅस्टिक मुक्तीसह हागणदारी मुक्त अभियान सशक्त करण्यासाठी अभोणा ग्रामपालिकेत झालेल्या विशेष ग्रामसभेत प्लॅस्टिक पिशव्या व इतर वस्तु न वापरण्याची शपथ देण्यात आली. मात्र अनेकांनी अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनास फैलावर घेतल्याने सभा गाजली. या ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व एका सदस्या व्यतिरीक्त इतर सर्व गैरहजर राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!