Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलली

Share
‘जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलली; JEE Main exam postponed

 

नाशिक । प्रतिनिधी

देशभरातील आयआयटी, एनआयटी आणि इतर प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये बीई, बीटेक, बीआर्क, बी-प्लॅनिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी जेईई मेन्स परीक्षा ‘करोना’ मुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही परीक्षा आता पुढे ढकलली आहे.
ही परीक्षा ५ ते ११ एप्रिलदरम्यान घेण्यात येणार होती. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक येत्या ३१  मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जेईई मेन्स परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येते. यातील जानेवारी महिन्यात परीक्षा झाली असून, या परीक्षेचा निकालदेखील जाहीर करण्यात आला. आता दुसरी परीक्षा ५ ते ११ एप्रिलदरम्यान घेण्याचे नियोजन एनटीएने केले होते; मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व परीक्षेला होणारी गर्दी विचारात घेऊन परीक्षा रद्द करण्यात आली. जेईई मेन्स परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन २० मार्चला उपलब्ध करण्यात येणार होते. आता हे प्रवेशपत्र ३१ मार्च रोजी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. अधिक माहिती www.nta.ac.in आणि jeemain.nta.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सीबीएसई, आयसीएसई परीक्षा पुढे ढकलल्या
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण बोर्डाने मोठे पाऊल उचलले. या दोन्ही मंडळांनी आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना स्थगिती दिली. ३१ मार्चनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन या परीक्षांचे पुढील वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.

एमसीए सीईटी ३० एप्रिलला
‘करोना’च्या पार्श्व’भूमीवर महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने २८ मार्च रोजी घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता ३० एप्रिल रोजी होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!