Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘आयटीआय’ पहिल्या फेरीत ४९३ जणांचा प्रवेश

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक विभागातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण घेण्यासाठी नाशिक आयटीआयतर्फे आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सलग पाच दिवसांच्या या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा पहिल्या फेरीत प्रतिसाद अत्यल्प राहिलेला आहे.

नाशिक विभागातील विविध २८ ट्रेडसाठी १३४४ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्या फेरीच्या प्रवेशात ४९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या प्रक्रियेतील इच्छुकांच्या टक्केवारीनुसार त्यांच्या निवडलेल्या ट्रेडनुसार गुणवत्ता यादी लावण्यात आली होती. त्यानुसार मुलांना लघुसंदेशही पाठवण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर मिळालेला प्रतिसाद अल्प आहे.

प्रत्यक्षात ११ जुलै (९३ प्रवेश), १२ जुलै (११४ प्रवेश), १३ जुलै (८७. प्रवेश), १४ जुलै (३० प्रवेश), १५ जुलै (१६१ प्रवेश), १६ जुलै (०८ प्रवेश)असे एकूण ४९३मुलांनी प्रवेश घेतला आहे.

प्रवेशाची दुसरी फेरी येत्या २० ते २५ जुलै दरम्यान होणार आहे. या फेरीत मोठ्या प्रमाणात जागा पूर्ण होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्राचार्य एस. एम. लाडसावंगीकर, उपप्राचार्य ए. एम. नारखेडे, आय. एम. काकड, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवक व निदेशक विशेष परिश्रम घेत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!