Friday, April 26, 2024
Homeनाशिकगंगापूर रुग्णालयासाठी लायन्स क्लब ऑफ नाशिक तर्फे इन्फ्रारेड थर्मामीटर भेट

गंगापूर रुग्णालयासाठी लायन्स क्लब ऑफ नाशिक तर्फे इन्फ्रारेड थर्मामीटर भेट

सातपूर । प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी च्या वतीने गंगापूर रुग्णालयासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर भेट देण्यात आला या थर्मामीटरने रुग्ण तपासनी करताना कर्मचाऱ्यां ची सुरक्षितता अबाधित रहावी हा उद्देश असल्याचे लायन्स क्लब स्मार्ट सिटी चे प्रमोद परशरामपुरिया यांनी सांगितले.

- Advertisement -

लायन्स क्लब नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने गंगापूर रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्याची पद्धत पडताळली असताना रुग्णांना थर्मामीटर लावणे शक्य होत नव्हते परिणामी तोंडी विचारणा करुन तापमानाचा अंदाज घेतला जात होता ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर लायन्स क्लब स्मार्ट सिटी च्या माध्यमातून येथे एक इन्फ्रारेड थरमामीटर भेट देण्यात आले.

या थर्मामीटर मुळे रुग्णांच्या शरीराला स्पर्श केल्याशिवाय त्यांचे तापमान तपासणे सोपे झाले आहे. प्रत्यक्षात गंगापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आनंदवल्लीचा प्रतिबंधित विभाग अनंदवलीची झोपडपट्टी, सोमेश्वर मंदिर परिसर, गंगापूर गाव, धृवनगर, शिवाजी नगर, श्रमिक नगर या भागातील नागरिकांना भेट देऊन त्यांच्या संस्थेची माहिती नोंदवावी लागत असते या पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांच्या आजारपणाची व तापमानाची माहिती लिहिणे सोपे होणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शासन स्तरावर याबाबत लक्ष देणे गरजेचे असून शहरासह ग्रामीण भागातील अशा वर्कर्स व परिचारिकांना तपासणीसाठी इन्फ्रारेड थर्मामीटर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शासनाने या यंत्रणांची उपलब्धता करून द्यावी असे आवाहन सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या