Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

१४ जानेवारीपासून भारत – ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

Share
१४ जानेवारीपासून भारत - ऑस्ट्रेलिया ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिका ; India Vs Australia-one-day-cricket-series-from-14th-january-2020

नाशिक  |सलिल परांजपे

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये येत्या १४ जानेवारीपासून ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर करण्यात येणार आहे. या मैदानावर एकूण ३३ हजार प्रेक्षक बसू शकतात हे मैदान रणजी संघ मुंबई आणि आयपीएल संघ मुंबई इंडिअन्सचे घरचे मैदान आहे गरवारे पॅवेलिअन एन्ड आणि टाटा एन्ड असे दोन एंड्स आहे.

ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची मदार एरन फिंच, डेविड वॉर्नर , स्टीव स्मीथ अलेक्स करी , पीटर हॅन्ड्सकॉब डार्सी शॉर्ट यांच्यावर आहे. तर अष्टपैलूंमध्ये केन रिचडसन एस्टर्न टर्नर एस्टर्न इगर यांच्यावर आहे गोलंदाजीत पॅट कमिन्स , जोश हेझलवूड मिचेल स्टार्क आणि एडम झाम्पा यांच्यावर आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार लोकेश राहुल , शिखर धवन , रोहित शर्मा , विराट कोहली , श्रेयस अय्यर , मनीष पांडे , रिषभ पंत यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये केदार जाधव , शिवम दुबे , रविंद्र जडेजा आहेत गोलंदाजीत शार्दूल ठाकूर , मोहंमद शमी , नवदीप सेनी कुलदीप यादव , जसप्रीत बुमरा आणि युझवेवेन्द्र चाहूल आहेत.

या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या दक्षिण आफ्रिका ४३८-४ विरुद्ध भारत ; २५ ऑक्टोबर २०१५ नीचांकी धावसंख्या बांगलादेश ११५२५ मे १९९८;  सर्वात मोठा विजय २१४ धावांनी विरुद्ध भारत २५ ऑक्टोबर २०१५;  निसटता विजय इंग्लंड ५ धावांनी विरुद्ध भारत ३ फेब्रुवारी २००२;  सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर १९९९४-२०११  ११ सामने ११ डाव धावा ४५५ ;  सर्वाधिक स्कोर ११४ फलंदाजीतील सरासरी ४१. ३६ १ शतक ३ अर्धशतक ३ सर्वाधिक षटकार एबी डिविलिअर्स;  ११ सर्वाधिक बळी १० षटके १ निर्धाव ३५ धावा ४ विकेट्स ट्रेंट बोल्ट आमनेसामने १२३ ७२ विजयी ऑस्ट्रेलिया ४१ विजयी भारत १० निकाल नाही ;भारतात लढती ५१ २५ विजयी ऑस्ट्रेलिया २१ विजयी भारत

हवामान : अंशतः ढगाळ

यांच्यावर असेल नजर  – रोहित , विराट , स्मीथ , वॉर्नर
भारत : लोकेश राहुल , शिखर धवन , रोहित शर्मा ,विराट कोहली , मनीष पांडे , केदार जाधव , रिषभ पंत रविंद्र जडेजा , शिवम दुबे जसप्रीत बुमरा , नवदीप सेनी शार्दूल ठाकूर युझवेन्द्र चहल कुलदीप यादव

ऑस्ट्रेलिया :एरन फिंच , अलेक्स करी , डेविड वॉर्नर , स्टीव स्मीथ , पीटर हॅन्ड्सकोम्ब , मर्नास लाबशेन , डार्सी शॉर्ट , केन रिचडसन , एसटूर्न टर्नर ,एसटूर्नइगर मिचेल स्टार्क पॅट कमिन्स आणि एडम झाम्पा जोश हेझलवूड

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!