Friday, April 26, 2024
Homeनाशिकइगतपुरी : स्वस्तधान्य दुकानदारास मारहाणी प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी : स्वस्तधान्य दुकानदारास मारहाणी प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी । प्रतिनिधी

तालुक्यातील कुरुंगवाडी येथील शासनमान्य स्वस्त दुकानदार शंकर सावंत यांना दि. ३१ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान गावातील रेशनकार्ड धारक मंगळु सावंत व त्यांच्या सोबत भावडु सावंत, विलास सावंत, रामनाथ तेलम यांनी धान्य रजिस्टर तपासणीच्या कारणावरून कुरापत काढुन दुकानदार व त्याच्या कुटुंबियांना मारहाण करीत शिवीगाळ करून काही रक्कम लुटली. याबाबत शासनमान्य स्वस्त दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसिलदार राजेंद्र कांबळे यांना दि. १ रोजी तक्रारी निवेदन देण्यात आले आहे.

- Advertisement -

कुरूंगवाडी येथील रेशन दुकानात मंगळु सावंत, भावडु सावंत, विलास सावंत, रामनाथ तेलम यांनी स्वस्त दुकानदाराला व त्याच्या कुटुंबातील महिला मुलांना मारहाण करीत शिवीगाळ केली आणि दुकानातील रोख रक्कम लुटली , आम्हाला रजिस्टर दाखव या कारणाने लाकडी दांडके घेवुन मारहाण करीत दगडफेक केली यात दुकान दाराच्या पत्नीलाही गंभीर मारहाण झाल्याने संबधीतावर गुन्हे दाखल करावा या मागणीचे निवेदन शासनमान्य दुकानदार विक्रेता संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार राजेंद्र कांबळे यांना दिले.

स्वस्तधान्य दुकानदारांना अनेक ठिकाणी वेठीस धरले जाते यात अनेकदा मारहाण होते, मात्र शासन स्तरावर दुकानदारांना कोणतीही सुरक्षा मिळत नसुन पोलीस प्रशासनही याबाबत दखल घेत नाही. यामुळे आम्ही लोकांना धान्य वितरण करायचे कसे असे अनेक मुद्दे तहसिलदारांना निवेदनाद्वारे लेखी दिले. मात्र यावर दोन दिवसात शासनाने दखल न घेतल्यास आणि सबंधीतावर गुन्हे दाखल न केल्यास शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदार विक्रेता संघटना आंदोलनाचा पवित्रा घेईल असा इशारा या निवेदनात देण्यात आल्याचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी सांगितले.

यावेळी स्वस्तधान्य दुकानदार व तक्रारदार शंकर सावंत, तालुका अध्यक्ष प्रल्हाद जाधव, दुकान दार संघटना सदस्य अनिता घारे, अरुण भागडे, तात्यापाटील भागडे, महिंद्र आडोळे,अनिल वारे, पंढरीनाथ भोसले, सरदसिंग परदेशी, पुना हंबीर, विष्णु राव, शांताराम आगीवले, शिवाजी चौधरी, ज्ञानेश्वर तोकडे, दिलीप मधे, सुरेश फोकणे, आदि उपस्थित होते .

- Advertisment -

ताज्या बातम्या