Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकइगतपुरी : वासाळीत उद्यापासून डांगी जनावरांचे प्रदर्शन व कृषी प्रदर्शन

इगतपुरी : वासाळीत उद्यापासून डांगी जनावरांचे प्रदर्शन व कृषी प्रदर्शन

घोटी । वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत गुरुवार दि. ९ ते ११ जानेवारी दरम्यान देशी व डांगी जनावरांचे प्रदर्शन व कृषी प्रदर्शन भरणार आहे.

- Advertisement -

वासाळी येथील ग्रामदैवत जय अंबिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनाला इगतपुरी तालुक्यातून व जिल्हाभरातून शेतकरी,देशी व डांगी बैल, गायी, संकरित व देशी बी बियाणे, शेतकीय अवजारे डिलर्स, कृषी एजन्सी, शेतकरी व महिला बचत गट, एन.जी.ओ संस्था तसेच कृषी संदर्भातील इतर सर्व स्टोल्स उपलब्ध असणार आहे.

गुरुवार दि. ९ रोजी प्रदर्शनाचा शुभारंभ होणार असून जय मल्हार मित्र मंडळातर्फे रात्री ९ ते पहाटेपर्यंत देवीचा जागर होणार आहे. शुक्रवारी दि. १० रोजी सकाळी ९ वाजता भव्य काठी व देवी मुखवटा मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत जुन्नर येथील खैरे गावातील जय आदिवासी लेझीम पथकाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

सकाळी अकरा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान या प्रदर्शनात आलेल्या देशी व डांगी जनावरांचे परीक्षण व बक्षीस वितरण ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते होणार आहे.

प्रदर्शनातील पारितोषिके
डांगी वळू ः प्रथम पारितोषिक रोख रक्कम ५००१ व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रोख ३००१ व  सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख 1001 व सन्मानचिन्ह.
अदात नर ः प्रथम पारितोषिक रोख ५००१ व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रोख ३००१ व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख १००१ व सन्मानचिन्ह.
गाय ः प्रथम पारितोषिक रोख ५००१ व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रोख 3001 व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख १००१ व सन्मानचिन्ह

५००१

- Advertisment -

ताज्या बातम्या