Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हुतात्मा एक्स्प्रेसचा दुसरा रॅकही एलएचबी; प्रवाशांना सुखद प्रवासाची अनुभूती मिळणार

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

मध्य रेल्वेने सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आणि भुसावळ-नाशिक-पुणे एक्स्प्रेसचे दुसरे रॅक (गाडी) नवीन एलएचबी स्वरुपात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुखद प्रवासाची अनुभूती मिळू शकणार आहे.

या नव्या एलएचबी (लिंके हॉफमैन बुश) कोचमध्ये अधिक सुरक्षा आहे. राइडिंग कम्फर्ट, कुशन यामुळे आरामदायक सीट्स  आहेत. खिड़क्या मोठ्या आहेत. तसेच बायो-टॉयलेट फिट करण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आणि भुसावळ-नाशिक-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस या प्रवासी रेल्वेगाड्या चालवते. पारंपरिक बोगीच्या (डबे) स्वरुपात या गाड्या धावत होत्या. या गाड्यांना नेहमी चांगला प्रतिसाद असतो. त्यामुळे पहिले रॅक एलएचबी स्वरुपात तयार करण्यात आले.

आता दुसरे रॅकही नवीन एलएचबी रॅकमध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. दुसरा एलएचबी रॅक १० नोव्हेंबरपासून पुणे-सोलापूर आणि भुसावळ-नाशिक-पुणे (डाऊन) गाडीच्या स्वरुपात धावेल.

एलएचबी रेकमध्ये परिवर्तित झाल्यानंतर या गाड्या १९ बोगींसह धावू लागतील. त्यामध्ये १४ व्दितीय श्रेणीच्या चेयर कार, एक वातानुकूलित चेयर कार, एक शयनयान श्रेणी, एक सामान्य व्दितीय श्रेणी आणि २ जनरेटर कम ब्रेक व्हॅन असतील.

दरम्यान भुसावळ-नाशिक-पुणे गाडी दीड महिना नाशिक ऐवजी मनमाड-दौंडमार्गे पुण्याला पोहचत आहे. त्यामुळे नाशिककरांना रस्तामार्गे पुण्याला जाताना जास्त पैसे, वेळ खर्चून पुण्याला जावे लागत आहे. वाहतूक कोंडीचा सामना करताना पुण्याला दहा तास लागत आहेत. त्यामुळे गाड्या आधुनिक करुन उपयोग नाही तर ठरलेल्या वेळेनुसार आणि ठरलेल्या मार्गाने त्या सोडाव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!