Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एचएएल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी खा. गोडसे, पवार यांनी दिल्लीत घेतली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट

Share

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून एचएएल कामगारांचा सुरु असलेला संप मिटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. खासदार हेमंत गोडसे,खासदार भारती पवार यांनी आज दिल्लीत  संरक्षण विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेत संपाचे गांभीर्य  अधिकांऱ्याच्या लक्षात आणून दिले. कामगारांच्या मागण्यांविषयी दिवाळीच्या आत तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले.

कामगारांना अधिकाऱ्यांप्रमाणेच वेतनवाढ आणि इतर अलाऊंसेस मिळावेत या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून एचएएल मधील कामगारांचा संप सुरू आहे.संपाची दखल घेत खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांनी आज केंद्रिय संरक्षण मंत्रालयातील प्रोडक्शन सेक्रेटरी सुभाषचंद्र यांची भेट घेतली. कामगारांच्या संपाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कामगारांमध्ये मोठया प्रमाणावर असंतोष निर्माण झाल्याने कामगारांच्या मागण्यांविषयी लवकरात लवकर तोडगा काढण्याची आग्रही मागणी गोडसे, पवार यांनी सुभाषचंद्र यांच्याकडे केली.

कामगारांच्या मागण्या न्यायिक असूून दिवाळीपूर्वीच यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन यावेळी सुभाषचंद्र यांनी गोडसे, पवार यांना दिले. या चर्चेतून अधिकाऱ्यांच्या तुलनेत कामगारांना बारा ते तेरा टक्के वेतनवाढ तर बावीस ते तेवीस टक्के इतर अलाऊंसेस दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे.

याबरोबरच ओझर एचएएलमधील वर्कलोड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून आऊटसोर्सिंगचे कामही एचएएलला मिळण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक सुखोईच्या बांधणीचे काम एचएएलला मिळण्याची चिन्ह आहे. काय करावे लागेल ते सर्व काही करा पण कामगारांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी स्पष्ट्र अन् आग्रही मागणी अधिकाऱ्यांकडे केली असून यावर लवकरच सकारात्मक तोडगा निघणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!