Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गुरूनानक जयंती निमित्त विविध कार्यक्रम

Share

नाशिक । प्रतिनिधी

धर्मगुरू गुरूनानक यांच्या ५५० जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये भजन,कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.गुरुनानक जयंतीनिमित्त शिंगाडा तलावाजवळील गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

गुरुनानक देवीजी सेवा असोसिएशनच्यावतीने गुरुनानक जयंतीनिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि.१२)करण्यात आले होते.यामध्ये सकाळी साडेसात वाजता दिल्लीच्या प्रभलीन कौरयांचा बालाप्रितम कीर्तन जथ्था, सकाळी आठ वाजता उत्सव समाप्तीनिमित्त अखंड पाठ,नऊ वाजता अमृतसरचे जगदीप सिंग यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत ओमविरसिंग, प्रभलीन कौर,जगदिपसिंग यांनी कीर्तन सेवा दिली.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देश-विदेशातील शीख बांधव या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुनानक जयंतीनिमित्त दि.२ नोव्हेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली होती.यामध्ये मंगळवार दि.५, शनिवार दि.९ या कालावधीत पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत शहराच्या विविध भागांमधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरुद्वारा गुरुनानक दरबार शिंगाडा तलावचे अध्यक्ष कुलवंतसिंग बग्गा,उपाध्यक्ष कुलविंदरसिंग गुजराल, सेक्रेटरी हरमिंदरसिंग सिब्बल, खजिनदार बलविंदरसिंग चौधरी व परमजीत सिंग मिग्लानी, गुरुद्वार प्रमुख ग्यानीजी जगविंदरसिंग यांनी विशेष प्रयत्न केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!