Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ग्राऊंड रिपोर्ट : सौभाग्याचं लेणं गहाण ठेऊन पीक वाढवलं होतं…

Share

नाशिक । गोकुळ पवार

‘बायकोचे दागिने गहाण ठेऊन पीक वाढवले होते; पण औंदा पावसाने पार नासधूस केली. त्यामुळे आता बायकोचे दागिने सोडवायचे का पिकाला जगवायचे असा प्रश्न पडलाय.’ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेगाव यथील शेतकरी बाळू कसबे यांनी ‘देशदूत’शी बोलताना ही व्यथा मांडली.

कसबे यांनी यंदा भात, टोमॅटो, काकडी, वाल या पिकांची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी बायकोचे दागिने गहाण ठेवले. परंतु परतीच्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाल्याने तसेच ज्या ठिकाणी 50 क्रेटस् काकडी निघायची आज त्या ठिकाणी 5 क्रेटस् निघत असल्याने धड मजुरी देता येईना अन् भांडवल सुटेना, अशी गत झाल्याचे ते सांगतात.

कसबे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील शेतात राबत असतात. त्यांचे म्हणणे असे आहे कि, सकाळपासून शेतात राबराब राबतोय पण पावसामुळे सगळ्या पीकाची नासधूस झाली आहे. एकीकडे मजुरी ३०० ते ४०० रुपये रोज द्यावा लागत आहे. तर दुसरींकडे आहे त्या पिकाला भाव नसल्याने मजुरी देखील निघत नाही. अन दिवाळी कशी आली अन गेली कळलं सुद्धा नाही. त्यामुळे सरकारनं आमचं गाऱ्हाणं ऐकावं, आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. जेणेकरून आमचा पुढं काही करता येईल.’ अशा शब्दांत भावनिक साद त्यांनी शासनाला घातली.

गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्र्यंबक तालुक्यातील परिसरात साधारण भात शेती अधिक असून येथील शेतकरी मध्यमवर्गीय असल्याने यंदाच्या ओल्या दुष्काळी परिस्थितीने कंबरडे मोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी आपली कथा अन् व्यथा मांडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

दरम्यान लोकप्रतिनिधी सह मंत्री सध्या दुष्काळ दौऱ्यावर असून ठिकठिकाणी अशीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी पीक पूर्ण पाण्यात आहे, तर काही ठिकाणी पूर्णतः सडून गेल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

एकूणच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा धीर खचवला असून यातून बाहेर काढण्याचे काम शासनाने करणे गरजेचे आहे. तसेच पिकांसह शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम शासनाने हाती घेतलं पाहिजे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!