Thursday, April 25, 2024
Homeनाशिकघोटी : आगरी युवा फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी, गेल्या महिन्यापासून भागवत आहे...

घोटी : आगरी युवा फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी, गेल्या महिन्यापासून भागवत आहे हजारो जणांची भूक

इगतपुरी । प्रतिनिधी

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या करोना साथीला अटकाव आणण्यासाठी शासनस्थरातून काटेकोरपणे नियमावली अंमलात आणल्यानंतर लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्यामुळे अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गोरगरीब जनतेला दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी शासनाच्या बरोबर अनेक सामाजिक आणि सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

- Advertisement -

यात इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यात ग्रामीण भागात घोटीतील आगरी युवा फाउंडेशनचे संस्थापक संतोष कडू यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत गेली महिनाभरापासून हजारो नागरिकांची भूक भागविली आहे. आगरी फाउंडेशन या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असुन अनेक कुटुंबाचे हातावर पोट आहे. गेल्या महिन्याभरापासून लोकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. शहरालगतच्या भागात अनेक मदतीचे हात पुढे येतात मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंब उपेक्षित राहत असल्याचे आगरी युवा फाउंडेशनचे संतोष कडू यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातही गरजू कुटुंबाला दोन वेळचे अन्न पुरविण्याचा निर्धार केला.

आगरी युवा फाउंडेशनचे संतोष कडू यांच्यासह संतोष भटाटे, गणेश छत्रे, हरिष भागडे, किशोर म्हसणे आदींनी कोणाचीही आर्थिक मदत न घेता गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागात पादाक्रांत करीत हजारो भुकेल्याना अन्नदान करीत भूक भागविली आहे. या सेवाभावी उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Attachments area

- Advertisment -

ताज्या बातम्या