Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

घोटी : शेतकरी ते थेट ग्राहक संकल्पनेतून आठवडे बाजार सुरू

Share
घोटी | प्रतिनिधी
वाढत्या महागाईला आळा घालण्यासह स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावा. परिसरातील शेतकर्‍यांचा १०० टक्के फायदा होऊन ग्राहकांनाही रास्त बाजारभावात शेतीमाल उपलब्ध व्हावा. यासाठी मध्यस्थाशिवाय शेतकरी ते थेट ग्राहक शेतमालाची विक्री करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीने  आठवडे बाजार सुरू केला आहे.
शेतकर्‍यांचा भाजीपाला, फळे, धान्य आदी उत्पादित शेतीमाल थेट पद्धतीने गोंदे दुमाला येथे आठवडे बाजारात विक्री करण्यात आला. सरपंच शरद सोनवणे, मार्गदर्शक माजी सरपंच गणपत जाधव यांच्या संकल्पनेतून हा आठवडे बाजार सुरू करण्यात आला. शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. सर्वसामान्य ग्राहकांचा आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला. आहे.
गोंदे दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सोनवणे, मार्गदर्शक माजी सरपंच गणपत जाधव यांनी ग्रामविकास अधिकारी हनुमान दराडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. शेतकरी ते थेट ग्राहक शेतीमाल विक्री करण्यासाठी दर शनिवारी आठवडे बाजार भरवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. ह्या बाजारातून ग्राहकाला रास्त दराने भाजीपाला आणि धान्य मिळावे हा हेतू आहे. ताजा, स्वच्छ व रास्त दरातील भाजीपाला आज शेतीमालाची विक्री प्रत्येक शनिवारी आठवडे बाजारात विक्री होणार आहे.
ह्या संकल्पने अंतर्गत शेतकऱ्यांचा थेट खाजगी बाजार, थेट पण, शेतकरी ग्राहक बाजार व कंत्राटी शेती आदींवर गोंदे दुमाला ग्रामपंचायत विशेष सहकार्य करणार आहे. ह्यातून अनेक पर्याय उपलब्ध करुन स्थानिक शेतकऱ्याला आपला कृषि माल विकण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून हा आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे. नागरिकांना ताजी भाजी थेट त्यांच्या दारात मिळावी आणि शेतकरी बंधूंना देखील दोन रुपये फायदा व्हावा, हा या मागील उद्देश आहे. स्वच्छ व ताजा भाजीपाला थेट शेतक-यांकडून मिळत असल्याने ग्राहक देखीलआनंदी झाले आहेत.
.ह्या आठवडे बाजारामध्ये सेंद्रिय व गावरान भाजीपाला-फळे, धान्य, कडधान्य, राजसी भाजीपाला, मसाले, लोणचे, पापड, गावरान तूप, अंडी उपलब्ध असणार आहे. दर शनिवारी हा आठवडे बाजार भरणार असून सकाळी ७  ते रात्री ८ अशी या बाजाराची वेळ असणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल नाठे, गणेश शेळके, भाऊसाहेब कातोरे, दत्तू नाठे, जनार्दन नाठे, रंगनाथ नाठे, केरु ठाणगे, शिवाजी सोनवणे, हिरामण जाधव, सिंधुबाई सोनवणे, लता पवार, चंद्रभागा सोनवणे, कुंदा कर्डक यांनी आठवडे बाजाराचा प्रसार करून सहकार्य केले.
शेतकरी आणि दुकानदारांना प्रोत्साहन म्हणून रोख रक्कम
आठवडे बाजारात सहभागी झालेले शेतकरी, छोटे दुकानदार, विक्रेते यांना सरपंच शरद सोनवणे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर रोख रक्कम वाटप करण्यात आली. रुपये १०० ते ३०० पर्यंत रक्कम प्रत्येकी देण्यात आली. आठवडे बाजारातील १०० पेक्षा जास्त शेतकरी आणि दुकानदारांनी प्रोत्साहन रक्कमेबद्धल ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले.
गोंदे दुमाला परिसरात विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये हजारो लोक काम करतात. ह्या सर्वांसह ग्रामस्थांना माफक किमतीत आणि सुलभतेने शेतीमाल आणि भाजीपाला, धान्य उपलब्ध व्हावे, स्थानिक शेतकऱ्यांना बाजारभाव आणि बाजारपेठ मिळून गाव स्वयंपूर्ण व्हावे ह्या उद्धेशाने शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजार सुरू केला आहे.
शरद सोनवणे, सरपंच गोंदे दुमाला
गोंदे दुमाला आणि परिसरातील शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल स्थानिक बाजारपेठेत विक्री करून फायदा व्हावा. नागरिकांचाही फायदा व्हावा ह्या हेतूने आम्ही काम करत आहोत. आठवडे बाजार संकल्पनेतून नव्या नव्या योजना आणि प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत काम करणार आहे.
– गणपत जाधव, माजी सरपंच तथा मार्गदर्शक गोंदे दुमाला
Attachments area
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!