Friday, April 26, 2024
Homeनाशिक६६६६ मुली, महिलांनी घेतले मोफत ज्यूदो कराटे प्रशिक्षण

६६६६ मुली, महिलांनी घेतले मोफत ज्यूदो कराटे प्रशिक्षण

नाशिक । प्रतिनिधी

गत काही वर्षांपासून महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महिलांवर होणारे अत्याचार व लैंगिक शोषणाला सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी त्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन व प्रशिक्षण शासनस्तरावरून देण्यात येत आहे. अशीच एक योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मुलींना मोफत ज्यूदो कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. गत अडीच-तीन वर्षांत आतापर्यंत ६६६६६ मुलींना मोफत ज्यूदो कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

- Advertisement -

महिलांना व मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता व त्यांच्या शारीरिक विकासासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या विभागामार्फत ज्यूदो कराटे प्रशिक्षण योजनेअंतर्गत महिला व मुलींवर होणारे अन्याय, त्यांचे होणारे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना त्यांना सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या मुली, महाविद्यालयीन मुली तसेच शाळेतील इच्छुक महिला शिक्षक यांना हे प्रशिक्षण देण्यात येते.

गत अडीच वर्षांत जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ६६६ मुली व महिलांनी विनामूल्य ज्यूदो कराटे व योगाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये सव्वीस प्रकल्प येतात. या सर्व प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या भागात महिला व मुलींना ज्यूदो कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रकल्पनिहाय प्रशिक्षणार्थी
प्रशिक्षण घेतलेल्या महिला व मुली प्रकल्प व तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.पेठ (२५६), हरसूल (२५६), सुरगाणा (२५६), सुरगाणा-2 (२५६), इगतपुरी (२५६), दिंडोरी (२५६), दिंडोरी-2 (२५६), नाशिक (२५७), त्र्यंबकेश्वर (२५६), देवळा (२५६), बागलाण (२५६), बागलाण-2 (२५६), कळवण (२५६), कळवण-2 (२५६, सिन्नर (२५६), सिन्नर-2 (२५६), निफाड २५६), मनमाड(२५६), पिंपळगाव बसवंत (२५६), नांदगाव (२५६), येवला (२५६), येवला-2 (२५६), चांदवड (२५६), चांदवड (२५६), चांदवड-2 (२५६), मालेगाव (२५६), रावळगाव (२५६) एकूण ६६६६

- Advertisment -

ताज्या बातम्या