Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

टोल नाक्यांवर उद्यापासून ‘फास्ट टॅग’अनिवार्य

Share

नाशिक । प्रतिनिधी

१ डिसेंबरपासून सर्वच टोल नाक्यांवर फास्ट टॅग अनिवार्य केला जाणार आहे. मात्र हा पथदर्शी प्रकल्प मोठ्या वाहनधारकांसाठी आत्तापासूनच डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र टोल नाक्यांवर पाहायला मिळत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (न्हाई) १ डिसेंबर २०१९ पासून सगळ्याच वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु काही टोल नाक्यांवर अद्याप फास्ट टॅगबाबत आवश्यक यंत्रणाच उपलब्ध झालेली नाही. टोल भरण्यासाठी वाहनधारक तासनतास ताटकळत उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. विविध ठिकाणच्या टोल नाक्यावर वाहनधारकांना फास्ट टॅग घेण्यासाठी बराच वेळ ताटकळत रहावे लागत आहे. एनएचएआयकडून नि:शुल्क फास्ट टॅग दिला जात आहे. मात्र काही वॉलेट कंपन्या व अन्य बँका यात पैसे आकारत असून केंद्र सरकारने फास्ट टॅग नि:शुल्क मिळणार असल्याचे सांगितले असताना या प्रकाराने ग्राहकांची लूट सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर.. दुप्पट कर भरा
१ डिसेंबरपासून सगळ्याच टोल नाक्यांवर फास्ट टॅगची सक्ती होणार आहे. त्यामुळे नाक्यावरील येण्या-जाण्याच्या प्रत्येकी एक मार्ग सोडून इतरत्र फास्ट टॅग असलेल्या वाहनांनाच जाण्याची सुविधा दिली जाईल. रोख रकमेसाठी केवळ एकच मार्ग असेल. लवकर जाण्याची इच्छा असलेल्या व फास्ट टॅग नसलेल्या व्यक्तीला फास्ट टॅगसाठीच्या मार्गावरून जायचे असल्यास दुप्पट पथकर मोजावे लागणार आहे.

फास्ट टॅग म्हणजे काय?
मोबाईलमधे असणारे सिमकार्ड सदृश्य स्टिकर वा चिप प्रत्येक वाहनांच्या समोरील काचेच्या आतून चिटकवले जाईल. त्यात वाहनधारकांना विशिष्ट रकमेचे रिचार्ज करावे लागेल. बँकेशी संलग्न फास्ट टॅगमध्ये वाहनधारकाच्या थेट खात्यातून रक्कम वळती होईल. या प्रक्रियेत संबंधित वाहन टोल नाक्यावरून जात असल्यास रांगेत लागण्याची गरज नाही. तेथील कॅमेर्‍यातील सेंसरमधून स्वयंचलित पद्धतीने वाहनधारकाच्या खात्यातून कराची रक्कम कपात होईल. २४ तासाच्या आतमध्ये हा वाहन धारक परत गेल्यास पूर्वीप्रमाणे सवलत कापून परतीची कमी रक्कम कपात होईल. रांगेत थांबण्याची किंवा रोख पैसे देण्याची गरज नाही.

महत्त्वाचे मुद्दे
*जेव्हा तुम्ही टोल नाक्यावरून जाल, तेव्हा पुढील १५ मिनटात वाहनधारकाला त्याच्या मोबाइलवर मेसेज येईल आणि ईमेल सुद्धा होईल. त्यात किती टोल आकारला गेला याची माहिती असेल.

*फास्ट टॅग वापरणार्‍यांना सर्वात मोठा फायदा असा की, जर ते २४ तासाच्या आत त्याच टोल नाक्यावर परत आले तर त्यांना रिटर्न चार्जेस किंवा फक्त ५० टक्के चार्जेस लागतील.

*फास्ट टॅग नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्षाकरिता ग्राह्य असणार आहे. चारचाकीसाठी ७०० रूपये (२०० रूपये सिक्युरिटी डिपॉजिट, २०० रु रिचार्ज मिळणार, १०० रु कार्ड किंमत, २०० रूपये अ‍ॅक्टिव्हेशन चार्जेस

*गाडीची कागदपत्रे, फोटो, गाडी मालकाचे आधार कार्ड फोटो, मोबाईल नंबर, इ मेल ( असल्यास ),गाडी मालकाचे जन्म तारीख असलेले कोणतेही ओळखपत्र.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!