Thursday, April 25, 2024
Homeनाशिकढगाळ हवामान व धुक्यामुळे द्राक्षबागा धोक्यात

ढगाळ हवामान व धुक्यामुळे द्राक्षबागा धोक्यात

पालखेड बं | वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असल्याने दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे.
काल पहाटे दिंंडोरी तालुक्यात ६ वाजेपासून धुके असल्याने  हवेत गारवा निर्माण झाला आहे. द्राक्षावर धुक्याचा विपरीत परिणाम होत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष फुगवणी थांबली असून द्राक्षांना तडे जात आहे. भुरी, आळई अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

- Advertisement -

या वातावरणामुळे शेतकर्‍यांना महागडी औषधे घेऊन फवारणी करावी लागत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती येत असल्याने कधी कांदा, कधी भाजीपाला याशिवाय इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. लाखो रुपयें द्राक्ष शेतीला खर्च केले जातात. मात्र उत्पन्न हजारो रुपये मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष शेती ही दिवसेंदिवस धोक्यात येतांंना दिसत आहे.

मागील वर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष शेतीची वाट लावली. या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. त्यातून शेतकरी सावरत असतानाच कधी थंडी तर कधी धुके यामुळे आता पुन्हा शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपासून सुर्य दर्शनही कधी होते तर कधी होत नाही याचाही फटका द्राक्ष शेतीला बसत आहे.

काल झालेल्या धुक्क्यामुळे द्राक्ष शेतीवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना महागडी औषधे फवारणी करावा लागत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे.
सुनील पाटील, शेतकरी निळवंडी

- Advertisment -

ताज्या बातम्या