Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकद्राक्ष निर्यातदार कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याची मागणी

द्राक्ष निर्यातदार कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याची मागणी

नाशिकमध्ये कृषी उपसंचालक कार्यालयात बैठक

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

द्राक्ष निर्यातदार कंपन्यांनी द्राक्ष उत्पादकांचे संपूर्ण पैसे द्यावे.अन्यथा अशा कंपन्यांवर सरकारने कारवाई करावी.या मागणीसाठी नाशिक येथे कृषी उपसंचालक यांची जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली.तेथूनच पणन संचालक व इतर अधिकाऱ्यांशीही या विषयावर सविस्तर चर्चा केली.

स्थानिक व्यापाऱ्यांना लायसन्स देण्यासाठी पुढील काळात वरिष्ठ पातळीवर आराखडा तयार करण्यावरही चर्चा झाली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले,आपचे जिल्हाध्यक्ष ॲड.प्रभाकर वायचळे, किसान सभेचे सुनील मालुसरे ,प्रहारचे जिल्हाध्यक्ष अनिल भंडागे, ॲड. कैलास खांडबहाले ,शेतकरी वाचवा अभियानाचे राम खुर्दळ, शेतकरी नाना बच्छाव, रामचंद्र निकम , शंकर फुगट आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या