Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : जिल्ह्यात पंधरा सखी मतदान केंद्रे

Share

नाशिक । प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीत महिला सखी केंद्र उभारण्यात आले होते. त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे’ उभारले जाणार आहेत.

या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि सेवक यांच्यासह सर्व जबाबदारी महिला पार पाडतील. या माध्यमातून महिला सबलीकरणाचा संदेश दिला जाणार आहे.

मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून ही मतदान केंद्रे महिला चालवणार आहेत. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रांत कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.

या सखी मतदान केंद्रांत तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. हे केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर करण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह येथील साफसफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे.

सखी मतदार केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. मतदारांची नावे शोधून नोंदी करण्यापासून तर शाई लावण्यापर्यंत सर्व कामे महिला सेवकच करताना या केंद्रात पाहावयास मिळणार आहे.

सखी केंद्र हे अन्य मतदान केंद्रांपासून ‘जरा हटके’ असणार आहे. प्रत्येक मतदारसंघातून एकाच मतदान केंद्राची निवड होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. राज्यात ३५२ सखी महिला केंद्रे उभारली जाणार आहेत.

मतदारसंघनिहाय सखी मतदान केंद्रे
– चांडक कन्या विद्यालय (सिन्नर)
– पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय, म्हसरूळ (नाशिक पूर्व)
– महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, गंगापूररोड (नाशिक मध्य)
– नवजीवन विद्यालय, शिवशक्ती चौक (नाशिक पश्‍चिम)
– देवळाली हायस्कूल, दिंडोरीरोड (देवळाली)
– जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टिटोली (इगतपुरी)
– जिल्हा परिषद शाळा, साकोरा (नांदगाव)
– जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल, कळवण बुद्रुक (कळवण)
– जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक स्कूल (चांदवड)
– येवला जनता विद्यालय, विंचूररोड (येवला)
– वैनतेय विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (निफाड)
– व्ही. एन. नाईक महाविद्यालय (दिंडोरी)
– आरम प्राथमिक विद्यालय (मालेगाव मध्य)
– पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प (मालेगाव बाह्य)
– जिजामाता गर्ल्स हायस्कूल (बागलाण)

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!