Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : मतदानाचे काऊंट डाऊन सुरु

Share

नाशिक । प्रतिनिधी

लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघासाठी येत्या सोमवारी (दि.२१) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १५मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रकिया सुरळित पकार पडावी यासाठी जय्यत तयारी केली आहे. सकाळी ७ ते सांयंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात ४ हजार ५७९ मतदान केंद्र आहे. तब्बल ४५ लाख ४४ हजार ६४१ मतदार मतदानाचा हक्क्क बजाविण्यासाठी पात्र आहे. मतदानासाठी अवघे काही तास उरले असून लोकशाहीच्या सर्वात मोठया उत्सवाचे काउंट डाऊन सुरु झाले आहे.

जिल्ह्यात १२,०४६दिव्यांग्य मतदार
१५ मतदारसंघात १२ हजार ४६ दिव्यांग्य मतदार आहेत. आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘पीडब्ल्यूडी’ अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. त्यानूसार या मतदारांना निवडणूक शाखेकडून थेट मतदान केंद्रावर पोहचविण्यात येणार आहे. तसेच, मतदान केंद्रावर त्यांच्यासाठी ४५० व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. अंध मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर ब्रेल लिपीत मतदान पत्रिका असणार आहे. त्यावर हात फिरवल्यावर उमेदवार व त्यांचे चिन्ह त्यांना समजेल व त्याआधारे ईव्हीएमवर ते मतदान करतील.

१५ सखी मतदान केंद्र
निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार लोकसभा निवडणुकीत महिला सखी केंद्र उभारण्यात आले होते. त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यानूसार जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ उभारले जाणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्व जबाबदारी महिला पार पाडतील.

६३ संवेदनशील मतदान केंद्र
जिल्ह्यातील १५ मतदारसंघात ६३ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ३३ संवेदनशील केंद्र हे शहरातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक मध्य मतदारंसघात आहेत. उर्वरीत मतदान केंद्र हे जिल्ह्यात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी
मतदान केंंद्रावर मतदारांना मोबाईल, कॅमेरा व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास सख्त मनाई आहे. या वस्तू मतदान करताना सोबत बाळगल्यास त्या जप्त केल्या जातील.

मतदानासाठी हे पुरावे सोबत बाळगा
पारपत्र, वाहन चालक परवाना, पासबुक, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड,.हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, खासदार व आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र यांसह ११ पुरावे

४५६ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग
मतदान प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी आयोगाने लोकसभा निवडणुकीपासून तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात चार हजार ५७९ मतदान केंद्र आहेत. या एकूण संख्येचा १० टक्के म्हणजे ४५६ मतदान केंद्राचे थेट लाईव्ह वेबकास्टिंग केले जाणार आहे. त्यासाठी बीएसएनएल कंंपनीकडून नेट सर्व्हिस पुरविण्यात येणार असून त्याचे नियोजन केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम
दिवसभर मतदान प्रक्रियेवर वॉच ठेवण्यासाठी व यंत्रणेला आदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम तयार करण्यात आला आहे. येथून १५मतदारसंघातली मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच, मतदान केंद्राचे वेबकास्टिंगवर येथून वॉच ठेवला जाईल. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दालनात टिव्ही सेट बसविण्यात आले आहे.

मतदान साहित्य वाटप
रविवारी (दि.२० सकाळी १५ मतदारसंघांमध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हिव्हिपॅट यंंत्रे, स्टेशनरी, शाई पोहचवली जाणार आहे. त्यासाठी एसटी बस, मिनी बस, ट्रक असे एकूण दोन हजार वाहनांची मदत घेतली जाणार आहे.

‘एनव्हीएसपी’ अ‍ॅपवर शोधा नाव
निवडणूक शाखेकडून मतदारांना घरोघरी वोटर स्लिप पोहचविण्यात आल्या आहेत. तसेच, मतदारांना त्यांचे नाव ‘नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल’ हे अ‍ॅप उपलब्ध करुन दिले आहे. त्यात मतदाराने त्याचे नाव टाकल्यास कोणत्या मतदारसंघात व मतदान केंद्रावर नाव आहे याची क्षणार्धात माहिती मिळेल.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!