Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : यंदा देवळालीत परिवर्तन होणार – बोराडे

Share

नाशिक । वार्ताहर

देवळाली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवार सरोज आहिरे यांना जनतेचा प्रचंड सहानुभूतीसह पाठींबा मिळत असल्याने यंदा या मतदार संघात परिवर्तन होणार, असा विश्वास गावोगावच्या पारावर चर्चिला जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत शेतकर्‍यांनी सत्ताधार्‍यांना धडा शिकवण्यासाठी देशाचे नेते शरदश्चंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात बदल घडवण्याचा संकल्प केला आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी समीरभाऊ भुजबळ यांनी देवळालीची जबाबदारी सोमनाथ बोराडे यांच्या टाकल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रवादीने या मतदार संघात जोरदार प्रचार करत पाया पक्का केला.

निवडणूक कठीण असली तरी अवघड नाही, अशी खूणगाठ बांधली. तसेच पक्षाला सरोज आहिरे यांच्या रूपाने ‘जायंट किलर’ ठरणारा उमेदवार मिळाला आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी सुरुवातीपासून पक्षाचे सर्व नेते सकारात्मक असून तन, मन व धनाने निवडणुकीला सामोरे जात आहे. ही निवडणूक आहिरे यांच्या व्यतिरिक्त जनतेने हातात घेतली आहे.

त्यामुळे प्रत्येक गाव व वस्तीवर त्यांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हे विजयाच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरावे. लढाई अटीतटीची असली तरी आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे कार्यकर्ते तळमळीने प्रचार करत आहेत. महत्वाच्या समस्यांना सरोज आहिरे ह्या न्याय देतील, हा विश्वास निर्माण झाल्याने अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विजय आपलाच असला तरी कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये.

या मतदार संघात सोमनाथ बोराडे यांची भूमिका महत्वपुर्ण ठरणार असून पक्षाचे नेते माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, कोंडाजीमामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुने, अ‍ॅड. रवींद्र पगार, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, राजाराम धनवटे, अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे, यशवंत ढिकले, प्रेरणा बलकवडे, अ‍ॅड.बाळासाहेब आडके, दीपक वाघ, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, बाळासाहेब म्हस्के, प्रभाकर पाळदे, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील कोथमिरे, संजय पोरजे, सोमनाथ खातळे आदींसह गावोगांवचे पदाधिकारी प्रचारात सक्रीय होते .

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!