Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : रविवारी १५ मतदारसंघात मतदान साहित्याचे वाटप

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील १५ मतदारसंघात येत्या सोमवारी (दि२१) मतदान होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. एक दिवस अगोदर रविवारी (दि.२०) सकाळी १५ मतदारसंघांमध्ये निवडणूक यंत्रे पोहचवली जाणार आहे. त्यासाठी एसटी बस, मिनी बस, ट्रक असे एकूण दोन हजार वाहनांची मदत घेतली जाणार आहे.

राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघात ही प्रक्रिया सुरळित पार पडावी यासाठी  ३० हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. मागील एक महिन्यापासून कर्मचारी रात्रदिवस एक करत आहेत. जवळपास ९५ टक्के मतदारांना वोटर स्लिप पोहचविण्यात आल्या आहेत.

निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. १५ मतदारसंघात ४ हजार ३०० मतदान केंद्र आहेत. त्या ठिकाणी ईव्हीएम, व्हिव्हिपॅट, मतदानाची शाई , स्टेशनरी व इतर साहित्य पुरविले जाणार आहे. रविवारी मतदान केंद्रांवर हे साहित्य दिले जाणार आहे.

वाहतुकीसाठी दोन हजार ३४ वाहनांची मदत घेतली जाणार आहे. प्रामुख्याने मतदान साहित्य व कर्मचारी वाहतुकीची सर्व मदार ही एसटी बसवर असणार आहे. मात्र, त्र्यंबक – इगतपुरी, दिंडोरी – पेठ, कळवण -सुरगाणा या आदिवासींसाठी राखीव मतदारसंघात अनेक मतदान केंद्र हे दुर्गम पाडयांवर आहेत. या ठिकाणी साहित्य पोहचवणे जिकरीचे काम आहे.

दळण वळणाच्या सुविधेअभावी एसटी देखील या ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यासाठी खासगी वाहनांची जीप, टेम्पो यासारखा खासगी वाहनांची मदत घेतली जाणार आहे. त्यात ५०४ एसटी, १०४ मिनीबस, १ हजार २४६ जीप, २३ ट्रक वाहन उपयोगात आणली जाणार आहे.

साहित्य वाटप केंद्र

नांदगाव – नांदगाव तहसिल कार्यालय
मालेगाव मध्य – शिवाजी जिमखाना
मालेगाव बाह्य – वखार महामंडळाचे गुदाम
बागलाण – तहसिल कार्यालय (बागलाण)
कळवण – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
चांदवड – देवळा – प्रशासकीय इमारत (चांदवड)
येवला – तहसिल कार्यालय
सिन्नर – तहसिल कार्यालय
निफाड – गणपतराव मोरे संस्थेचे महाविद्यालय (निफाड)
दिंडोरी – पेठ – मविप्रचे कला,वाणिज्य महाविद्यालय (दिंडोरी)
नाशिक पूर्व – विभागीय क्रीडा संकुल
नाशिक मध्य – दादासाहेब गायकवाड सभागृह
नाशिक पश्‍चिम – छत्रपती संभाजी स्टेडियम
देवळाली – विभागीय कार्यालय
इगतपुरी – त्र्यंबकेश्‍वर – कन्या शाळा, सीबीएस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!