Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्णत्वाकडे

Share

नवीन नाशिक । प्रतिनिधी

मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी संभाजी स्टेडियम येथील इनडोअर स्टेडियम परिसरात होणार असल्याने प्रशासनातर्फे तयारीस जोर आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर निवडणूक विभागाकडून इनडोअर स्टेडियमच्या बाहेर भव्य मंडप टाकण्यात आला आहे. ईव्हीएम मशिन व मतमोजणी कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले आहेत.

त्यासोबतच सदर परिसरामध्ये कुठलीच घटना बाहेरच्यांना दिसू नये याकरिता संपूर्ण ठिकाणी अवती भोवती पत्रे लावण्यात आले आहेत. अग्निशमन दलाची गाडी, वैद्यकीय उपचार सेवा, पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!