Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : गतवर्षी ६५ तर यंदा ६० टक्के मतदान; शहरी मतदार पिछाडीवर; ग्रामीण मतदार आघाडीवर

Share

नाशिक ।प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाकडून मोठया प्रमाणात जनजागृती मोहीम राबवूनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याचा मतदानाचा टक्का घसरल्याचे पहायला मिळत आहे. सन २०१४ विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ६५ टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र, हे प्रमाण ६०.१३ टक्के इतके आहे.

जिल्हा प्रशासनाने सहा महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वोट कर नाशिक’कर ही मोहीम राबवली होती. परिणामी जिल्हयातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत होते. मतदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात होते.

व्हिव्हीपॅट, ईव्हीएम यंत्रांबाबत माहिती देण्यात आली. ‘वोट कर नाशिक’कर हा उपक्रम देखील राबविण्यात आला. समाज माध्यमांद्वारे मतदान करा, हा संदेश देण्यात आला. जिल्ह्यात जवळपास तीन हजार सेलिब्रिटी मतदार नेमण्यात आले. तरुणाईने मतदानाचे कर्तव्य बजवावे यासाठी अभिनेता चिन्मय उदगीरकर याला ब्रॅण्ड अम्बेसिडर नेमण्यात आले होते. ऐवढी मेहनत घेऊनही विशेषत: शहरी मतदारांनी त्यावर पाणी फेरले. गतवर्षी जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी ही ६५ टक्के इतकी होती. यंदा मात्र, मतदानाच्या टक्केवारीचा आकडा हा ६० च्या पुढे सरकला नाही.

शहरी सुशिक्षित मतदार उदासीन
जिल्ह्यातील १५ पैकी तीन मतदारसंघ हे शहरात येतात. नाशिक मध्य, नाशिक पूर्व व नाशिक पश्‍चिम यांचा त्यात समावेश आहे. शहरातील मतदार हा सुशिक्षित व स्वत:च्या अधिकाराबाबत सजग मानला जातो. मात्र, नेमके या उलट चित्र पहायला मिळाले. या तिन्ही ही मतदारसंघात जिल्ह्याच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी ही ५५ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान हे नाशिक पूर्वमध्ये ४७ टक्के इतके झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!