Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणूक २०१९ : विधानसभेसाठी आज मतदान ; मतदानासाठी जिल्हा सज्ज

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसांठी आज सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून त्यात जिल्ह्यातील १५ मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यात तब्बल ४५ लाख ४४ हजार ६८१ इतके मतदार मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी पात्र आहेत. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचारासाठी अवघे पंधरा दिवस मिळाले होते. या कालावधीत दिग्गज नेत्यांच्या तोफा नाशकात धडाडल्या. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरींनी धुराळा उडाला होता. शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आता प्रचाराचा धुराळा खाली बसला असून सोमवारी मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील १५ मतदारसंघात १४८ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात चार हजार ५७९ मतदान केंद्र आहेत. रविवारी (दि.२०) या मतदारसंघांमध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व इतर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.त्या-त्या मतदारसंघातील कंट्रोल रुममध्ये हे साहित्य सुरक्षितरीत्या ठेवण्यात आले.त्यासाठी एसटी बस, मिनी बस, ट्रक असे एकूण दोन हजार वाहनांची मदत घेण्यात आली.

दिवसभर यंत्रणा या कामाची लगबग पहायला मिळाली. तसेच, ऐनवेळी मतदान यंत्रात बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून एकूण यंत्राच्या दहा टक्के जादा यंत्रांची व्यवस्था करण्यात आलाी आहे. सर्वाधिक उमेदवार १९ हे नाशिक पश्‍चिम मतदारसंघात उभे आहेत. या ठिकाणी दोन ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहे.

६३ संवेदनशील मतदान केंद्र
१५ सखी मतदान केंद्र
१२ हजार ४६ दिव्यांग मतदार
४५६ मतदान केंद्राचे वेबकास्टिंग
नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर शोधा नाव

हे पुरावे सोबत बाळगा
पारपत्र, वाहन चालक परवाना, पासबुक, पॅनकार्ड, मनरेगा जॉब कार्ड,.हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, खासदार व आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र.

लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी सहभागी होत मतदानाचा हक्क बजवावा. लोकशाहीत प्रत्येकाचे मत अमूल्य आहे. मी मतदान करणार हे, तुम्ही पण करा.
– सूरज मांंढरे, जिल्हाधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!