Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशिक्षणसेवकांचे मानधन वाढवणार

शिक्षणसेवकांचे मानधन वाढवणार

नाशिक ।  प्रतिनिधी

शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडून प्राप्त झाला असून, त्यावर कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. लवकरच शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

- Advertisement -

सन २०१२ पासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे मानधन प्रतिमहिना सहा हजार आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे १२ हजार रुपये आहे. त्यात भरीव वाढ लवकरच केली जाणार आहे’, असे ते म्हणाले. मात्र, शिक्षणसेवक योजना रद्द करून सहायक शिक्षकांची भरती करण्याबाबत शासन स्तरावर विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यासह राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून १० : २० : ३०  आश्वासक प्रगती योजना श्रेणीवाढ लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, नोकरभरतीसाठीच्या पवित्र पोर्टलमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक भरतीप्रकरणी तरतूद नाही.

मात्र, त्यासंदर्भात पोर्टलमध्ये दुरुस्ती करण्यात यईल, असे कडू एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. अपंग समावेशित शिक्षण योजनेतील (माध्यमिक स्तर) कार्यरत असलेले कोणते विशेष शिक्षक समायोजनासाठी पात्र आहेत, हे निश्चित करूनच त्यांचे समायोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या