Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

द्वारका चौकातील भुयारी मार्गाची नियमित देखभालीची गरज

Share

नाशिक | चैत्राली अढांगळे

उड्डाणपुलाच्या निर्मितीच्या चार वर्षांनंतरही महामार्ग विशेषत: द्वारका परिसरातील. भूयारी मार्गाचा पादचाऱ्यांकडून याेग्य वापर झाला तर या ठिकाणची  रस्ते ओलांडतानाचे अपघात कमी होण्यास   मदत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण, महापालिका, पोलिस प्रशासनाने बैठक घेऊन भूयारी मार्गाबाबत प्रभावी उपायायोजना सुचविल्यास पादचाऱ्यांकडून या भूयारी मार्गाचा वापर वाढू शकतो. याबाबत संबंधित विभागांकडून नागरिकांमध्ये प्रबोधनही केले गेले पाहीजे.

द्वारका परिसरातून शिर्डी, सिन्नर, मुंबई, मालेगाव, चांदवड आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी वाहतूक सुरू असते. त्यामुळे परिसरात नेहमीच वर्दळ असते. या वर्दळीत अनेकदा पादचाऱ्यांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता या ठिकाणी भुयारी मार्ग साकारण्यात आला. यासाठी दोन ते अडीच कोटी रुपये खर्चही करण्यात अाला. त्याचे २०१३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले होते

याच ठिकाणी शहरासाठी महत्वाचं ठरणाऱ्या या प्रशस्त पाच द्वार असलेल्या भुयारी मार्गामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता जपली जाईल अाणि महामार्गावरून रस्ता अाेलांडताना हाेणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा नाशिककरांना हाेती. मात्र, अल्पावधीतच शहरवासियांची ही अपेक्षा निराशाजनक ठरली. प्रशासनाकडून या भुयारी मार्गाच्या नियमित देखभाल-दुरुस्तीकडे तसेच सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात अाले अन‌् काही वर्षातच त्याला अवकळा अाली.  महापालिका प्रशासन,  राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने या गाेष्टीकडे लक्ष दिले नाही . परिणामी, येथे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरलेली, तसेच ड्रेनेजची लाईन तुटून प्रचंड दुर्गंधी पसरलेली, अनेक विद्युत दिवेही बंद स्थितीत असल्याचे दिसून अाले.

रात्रीच्या सुमारास या ठिकाणी प्रकाशाअभावी असुरक्षितता जाणवते. दुरवस्था तसेच असुरक्षिततेमुळे पादचाऱ्यांनी या भुयारी मार्गांकडे पाठ फिरवली अन‌् टवाळखाेर, गैरप्रकार करणाऱ्यांनी या मार्गाचा ताबा घेतला. ह्यामुळे भागात दहशत निर्माण झाली असून गुन्हेगारी वाढली असून परिणामी, पाेलिस प्रशासनापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. याबाबत नागरिकांच्या तक्रारी अलिकडे वाढू लागल्या हाेत्या, म्हणून पाेलिसांनी हा मार्गच बंद करून टाकण्याचा अजब पर्याय अवलंबला. ह्यामुळे या भुयारात खूप दुर्गंधी पसरली असून घाण कचरा ,दारूच्या बाटल्या ,तसेच तेथील पादचारी मार्गात पाण्याचे डबके तयार झाले असून लोकही नाईलाजाने त्याच पाण्यातून ये जा करतात पाेलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक नागरिकांना अाता परत धाेकादायक पद्धतीने रस्ता अाेलांडावा लागत आहे अशा स्थितीत अपघात झाल्यास जबाबदार काेण, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे.

द्वारका,जुने नाशिक, काठेगल्ली या परिसरातील पादचाऱ्यांसह येथून जाणाऱ्या प्रवाशांना भुयारी मार्गाचा मोठा आधार होता. महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडून या भुयारी मार्गाची देखभाल केली जात नाही ही वेगळीच बाब आहे. मात्र, केवळ या ठिकाणी गुन्हेगारी घटना घडू शकतात. या कारणाने बॅरिकेड‌्स लाऊन भुयारी मार्गाचा वापरच बंद कण्याचा पोलिस प्रशासनाने निर्णय घेतला. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त हाेत अाहे. विशेष म्हणजे, या भुयारी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीबाबतची जबाबदारी त्यामुळे ही समस्या जैसे थेच अाहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!