Saturday, April 27, 2024
Homeनाशिकज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी 

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं आज  वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं.दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेलं योगदान अतिशय मोठं होतं. रंगभूमीवरही त्यांनी केलेली अनेक नाटकं प्रचंड गाजली होती.

- Advertisement -

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू असे त्यांच्या वडिलांचे तर सत्यभामा लागू त्यांच्या आईचे नाव होते. प्रारंभीचे त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

कॉलेज जीवनापासून लागू यांना कलेची आवड निर्माण झाली. वैद्याकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच श्रीराम लागू यांनी नाटकात काम करण्यास सुरूवात केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या