Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्यरानी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी- खा.डॉ. भारती पवार

Share
राज्यरानी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी- खा.डॉ. भारती पवार; Dr.Bharti pawar : Demand To start Rajyarani Express from manmad as usual

नाशिक ।  प्रतिनिधी

राज्यराणी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करून नाशिककरांना न्याय मिळवून द्यावा या अनुषंगाने दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची त्यांचे मुंबई येथील दालनात भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपूर्वी मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस विस्तारित करण्यास खासदार डॉक्टर भारती पवार यांनी तीव्र विरोध देखील केला होता. राज्यराणी नांदेडपर्यंत वाढविण्याऐवजी नांदेड मुंबई नवीन गाडी सुरू करावी. आणि राज्यराणी एक्सप्रेसला पूर्ववत सुरू करून परतीच्या प्रवासात निफाड, लासलगाव हे थांबे द्यावे, जेणेकरून दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल होणार नाही असे खा.डॉ.भारती पवार यांनी मित्तल यांना सांगितले.

राज्यराणी ही स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाची गाडी आहे. घेतलेल्या निर्णयामुळे मनमाड – मुंबई मनमाड – पंचवटी एक्सप्रेसवर गर्दीचा भार वाढेल आणि यापूर्वीदेखील तपोवन एक्सप्रेस ही मनमाड व नाशिकसाठी असलेली गाडी नांदेडपर्यंत वळवली. त्यामुळे राज्यराणी नांदेडपर्यंत वळविण्या ऐवजी नांदेड मुंबई मार्गावर नवीन रेल्वे गाडी सुरू करावी अशी आग्रही मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी मित्तल यांचेकडे केली आहे.

सदर चर्चेदरम्यान मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी खासदार डॉक्टर भारती पवार यांना आश्वासित केले की मनमाड व नाशिककरांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची तसेच त्यांच्यासाठी असणारे डबे हे त्यांच्या साठी आरक्षित असतील व वेळेत ही कुठला ही बदल होणार नाही नक्कीच दखल घेणार असल्याचे सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!