Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिवाळी सुरक्षित साजरी करावी; महावितरणचे नागरिकांना आवाहन

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

दिवाळीची लगबग सुरु झाली असून सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे. दिवाळीचा आनंद अधिक व्दिगुणित करण्यासाठी विद्युत सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई व आतिषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे असते, अशा घटनांनी आनंदाचे वातावरणावर पाणी पडते. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी.

दिवाळीच्या फटाक्याने लागलेल्या आगीच्या घटना दरवर्षीच हजारोच्या संख्येने होतात. यात केवळ आर्थीकच नव्हे तर जीवीतहानीही मोठ्या प्रमाणात होत असते, सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने निष्काळजीपणा आणि उदासिनता यामुळे अशा घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबियांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी महावितरणने काही खबरदारीचे उपाय सुचविले आहेत.

दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करतांना ती मोकळ्या जागेतच लावावीत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दुर आणि उंचीवर तसेच पंखे, वीज तारा यापासूनही ते शक्यतो दूर ठेवावेत.

उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेल्या वीज तारा वापरु नये. किंवा जोड देतांना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करुन घ्यावेत, तुटलेले सॉकेट्स वापरू नये, घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत असे आवाहन महावितरणने केले आहे.

अशी खबरदारी घ्यावी...
फटाके उडवितांना मोकळ्या जागेतचं उडवावे. वीज,खांब तारांच्याजवळ वा ताराखाली फटाके उडवू नये. विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नये. विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये. रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्यूत दिवे त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात. आकाशकंदील वा दिव्यांच्या माळा लावतांना मुख्य प्लगवरून बोर्डाला कनेक्ट करताना थ्री पिन जोडणी करणे आवश्यक आहे.

रोषणाई करताना वायरमध्ये जे जोड देण्यात येतात ते बर्‍याचवेळी उघडे असतात त्यामुळे जोडाला स्पर्श होताच अपघात होऊ शकतो. अनेक वेळेस थ्री पिनचा वापर न करता पीन थेट प्लगच्या छिद्रात खोचताना अशावेळी वायरिग खोचाखोचीमुळे अथवा ओवरलोडींग मुळे त्या प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याचा संभव असतो. रोषणाई बहुतांशी बाल्कनीच्या ग्रीलला निरनिराळ्या ठिकाणी जोडून अथवा सेलोटेपच्या मदतीने लावली जाते, अशावेळी माळेमुळे लोखंडी जाळीमध्ये वीजप्रवाह आल्यास अपघात होतो.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!