Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी सुविधापूर्ण असावे : मांढरे

जिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी सुविधापूर्ण असावे : मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

खेळाडूंसाठी सर्व सुविधापूर्ण जिल्हा क्रीडा संकुल तयार करण्यात येऊन खेळांच्या सुविधेत कोणतीही तडजोड करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी दिल्या.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जि.प. बांधकाम सभापती संजय बनकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैशाली झनकर, कार्यकारी अभियंता पांडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करून त्यांना क्रीडा क्षेत्रात चांगली कारकीर्द घडवण्यासाठी क्रीडा संकुल हे एक व्यासपीठ असल्याने जिल्हा क्रीडा संकुलाची रचना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे क्रीडा संकुल बनवताना त्याची देखभाल दुरुस्ती व पुरवण्यात येणार्‍या सोयीसुविधांच्या अनुषंगाने त्यात काही प्रमाणात व्यावसायिक दृष्टिकोन असणे देखील गरजेचे आहे. तसेच त्यात नवीन कल्पनांचा व आधुनिक क्रीडा सामग्रीचा देखील वापर करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हा क्रीडा संकुलासाठी ८ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी साधारण ४ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यानुसार वास्तुविशारदांकडून सदर जिल्हा क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करून घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी दिली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या इतर सदस्यांनी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या