Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महिला दिनानिमित्त ‘नवदुर्गा’ पुरस्कारांचे वितरण

Share
महिला दिनानिमित्त 'नवदुर्गा' पुरस्कारांचे वितरण; Distribution of 'Navadurga' Award on Women's Day

नाशिक | प्रतिनिधी 

कालिका मंदिर देेेेवी ट्रस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा साधना, नाशिक यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आज   ‘नवदुर्गा पुरस्कार ‘ आणि ‘महिला पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले  होते. या कार्यक्रमात कला, क्रीडा, सामाजिक,  शासकीय सेवा, वैद्यकीय, उद्योग, राजकीय, कायदा विषयी अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘ नवदुर्गा पुरस्कार ‘ प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या २४ महिलांनाही यावेळी ‘महिला पुरस्कार’ देवून  सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याच्या माजी आरोग्य मंत्री तथा माजी महापौर  डॉ. शोभाताई बच्छाव, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, यांचा कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया, सरचटणीस डॉ. प्रतापराव कोठावळे, संचालक श्रीराम कोठावळे, दत्ता पाटील, क्रीडा साधनाचे अध्यक्ष अशोक दुधारे आदींच्या हस्ते शाल,  श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

या सन्मानित करण्यात आलेल्या ‘नवदुर्गा पुरस्कार’ मध्ये सौ. हेमांगी पाटील, डॉ. चैताली बोरस्ते- कदम, सौ. ममता कुलकर्णी, सौ. संगीता  गायकवाड, डॉ. प्रणिता गुजराथी, .अँड. वसुधा कराड,.सौ. वैशाली  वाघ, सौ. ज्योती निरगुडे,  अर्की  आर्कीटेकट अमृता पवार  यांचा समावेश आहे.

‘महिला पुरस्कार’ पहिल्या महिला पुरोहित स्मिता आपटे, जागृती शहारे आणि  सायली पोहरे,(छत्रपती पुरस्कार), संध्या शिरसाठ ( अपंग सेवा), हेमा रत्नपारखी ( आकाशवाणी निवेदिका ), हेमांगी पाटील ( स्काऊट- गाईड आयुक्त), शुभांगी टाकळकर ( मुख्याधिपिका), योगिता खैरनार ( प्राथमिक शिक्षक), मंजुषा पगार (आंतरराष्ट्रीय खेळाडू), पी. झेड . ठिगळे ( ग्राम विकास अधिकारी), रुपाली फुले,  पूनम जाधव ( शिक्षिका ), कांचन वालझाडे ( योगा), अदिती सोनावणे ( जिल्हा क्रीडा पुरस्कार)आदींचा समावेश होता. यावेळी या सन्मानित प्रत्येक पुरस्कारर्थीच्या कार्याची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

यावेळी बोलतांना माजी आरोग्यमंत्री  डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सांगितले की आज विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर आणि त्यांच्याही पुढे जाऊन महिला चांगले कार्य करत आहेत.  त्यांची या प्रेरणा घेवूंन समाजातील जास्तीत जास्त महिलांनी पुढे जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

रवींद्र नाईक यांनी सांगितले की वर्षातून एक दिवस महिला दिन न पाळता महिलांच्या कर्तबगारीची जाणीव वर्षभर  आणि कायमस्वरूपी ठेवणे आवश्यक आहे असे सांगितले. तर केशव अण्णा पाटील यांनी आम्ही धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्याची जाणीव ठेवून गरजू व्यक्तीना मदत आणि सहकार्य कसे मिळेल यासाठी काम करत आहोत असे सांगितले.

यावेळी पुरस्कारार्थीं उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील  यांनी  सत्काराला उत्तर देतांना सांगितले की कालिका मंदिर ट्रस्ट, क्रीडा कार्यालय आणि क्रीडा साधना यांनी  वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना हेरून त्यांना सन्मानित केले आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे असे सांगितले.

अँड. वसुधा कराड यांनी सांगितले की महिलांचे कार्य बघून त्यांना सन्मानित करणे याची प्रचीती या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आली आहे. यासाठी त्यांनी आयोजकांचे आभार मानले. तर पहिल्या महिला पुरोहित स्मिता आपटे यांनी महिलंच्या  कर्तबगारीवर सुंदर कविता सादर केली.

या कार्यक्रमाचे प्रस्तविक आनंद खरे यांनी केले तर महिलांच्या कर्तबगारीचा अहवाल अस्मिता दुधारे यांनी सादर केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक दुधारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, भरत पाटील, राम पाटील,  अविनाश खैरनार,  सोनार, शशांक वझे, मनोज म्हस्के, दीपक निकम, मनीषा काठे, मनोज खैरनार आदिंनी परिश्रम घेतले .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!