Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसप्तशृंगीगड : गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सप्तशृंगीगड : गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सप्तशृंगीगड । वार्ताहर

सप्तशृंगी गडावर मंगळवारी १२ वाजेच्या सुमारास भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) नाशिक जिल्हा व कळवण तालुका किसान सभा यांच्या वतीने गोर- गरीब- गरजूंना मोफत धान्य व किराणा वाटप करण्यात आले. ४ दिवस पुरेल एवढे अत्यावश्यक वस्तूचे वाटप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे .पी.गावित व कळवण तालुक्यातील गटविकास अधिकारी बहिरम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्क्सवादी पक्षाचे पदाधिकारी ,व सप्तशृंगीगड ग्रामस्थ  उपस्थित होते.

- Advertisement -

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारातून ६०० लोकांना धान्य जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. विशेषतःअनाथ. निराधार. अपंग.हातावर काम करणारे नागरिकांची यामुळे उपवास मार होत आहे.दरम्यान ही बाब लक्षात घेऊन मार्क्सवादी पक्षाचे माजी आमदार गावित यांनी धान्य वाटप केले . समाजसेवक रामप्रसाद बत्तासे सप्तशृंगीगड ग्रामस्थानच्या वतीने माजी आमदार यांचे आभार व्यक्त केले .

- Advertisment -

ताज्या बातम्या