Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

दै.‘देशदूत’ तेजस पुरस्कारांचे आज वितरण

Share
दै.‘देशदूत’ तेजस पुरस्कारांचे आज वितरण; Distribution of 'Deshdoot ' Tejas Awards today

सहा क्षेत्रातील २४ नामांकने; उत्सुकता शिगेला

 

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून उत्सुकता लागून असलेल्या ‘देशदूत’ तेजस पुरस्काराचे वितरण आज शुक्रवारी दै.‘देशदूत’ कार्यालयात पार पडणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील यशवंतांना प्रमुख पाहुणे नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या युवकांचा दै. ‘देशदूत’च्या वतीने दरवर्षी ‘तेजस’ पुरस्कार प्रदान करून गौरव केला जातो. या पुरस्कारामध्ये नामांकने मागवण्यात आली होती. तद्नंतर उत्कृष्ट नामांकनांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती लिखित आणि ‘देशदूत’च्या संकेतस्थळावर व्हिडिओसह प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यानंतर याच पुरस्काराचा एक भाग म्हणून ‘देशदूत’च्या www.deshdoot.com संकेतस्थळावर दहा दिवस ऑनलाईन मतदान प्रक्रियादेखील घेण्यात आली. यामध्येही जवळपास ७२ पेक्षा अधिक देशातील युजर्सने या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे.

यावर्षी सहा क्षेत्रांमधून नामांकने मागवण्यात आली होती. यामध्ये सेल्फ सस्टेन्ड बिझनेस, सामाजिक/सांस्कृतिक, फायनान्स, विधी, वैद्यकीय व प्रगतिशील शेती या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. यामधील प्रत्येक नामांकनप्राप्त युवकाची अनोखी भूमिका, अनोखी कथा आहे.

प्रत्येकानेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशा या यशवंतांचा गौरव समारंभ दै.‘देशदूत’ कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी झाली निवड प्रक्रिया
युवकांनी दिलेल्या मुलाखतीतून आणि त्यांचा व्हिडिओ बघून परीक्षकांच्या माध्यमातून पारदर्शकपणे निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. यानुसार प्रत्येक कॅटेगिरीतील एका पुरस्कार विजेत्याचे नाव परीक्षांकडून देण्यात आले. तसेच ‘देशदूत’च्या ुुुwww.deshdoot.com या संकेतस्थळावर घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेतून सर्वाधिक पसंतीक्रम मिळवलेल्या युवकांस ऑनलाईन क्षेत्रातील पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, नामवंत व्हा…
दै.‘देशदूत’ तेजस पुरस्कार वितरणाच्या दिवशी यश या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले या संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लाईफ कोच मंदार राजेंद्र, ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. शिरीष सुळे आणि नगरसेविका हिमगौरी आडके-आहेर यांची उपस्थिती असणार आहे.

कुठल्या कॅटेगिरीतून कोण आहेत यशवंत?

सेल्फ सस्टेन्ड : प्रवीण कमळे, चेतन पाटील, परेश चिटणीस, युगंधर तुपे

सामाजिक, सांस्कृतिक : जगबिर सिंग, आशिष रानडे, सुजित काळे, वैभव भोगले

फायनान्स : पीयूष चांडक, विशाल पोद्दार, सचिन खराटे, अनिल दहिया.

लॉयर्स कॅटेगिरी : जयदीप वैशंपायन, पंकज चंद्रकोर, संदीप मोरे, प्रवर्तक पाठक

वैद्यकीय : डॉ. सागर केळकर, डॉ. वैभव पाटील, डॉ. विभव येवलेकर, डॉ. चंद्रशेखर पेठे.

प्रगतिशील शेती  : अरुण भामरे, वसंत शेजवळ, अक्षय देवरे, भाऊसाहेब मते.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!