Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदिंडोरी शहरातील सर्व नागरिकांसाठी होमिओपॅथी टॅब्लेटस ‘अर्सेनिक अल्बम-३०’ चे मोफत वितरण

दिंडोरी शहरातील सर्व नागरिकांसाठी होमिओपॅथी टॅब्लेटस ‘अर्सेनिक अल्बम-३०’ चे मोफत वितरण

दिंडोरी । प्रतिनिधी

शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत होमिओपॅथी टॅब्लेटस अर्सेनिक अल्बम ३० चे वितरण करण्यात आले. नगरसेवक तुषार वाघमारे यांच्या प्रयत्नांतून व दिंडोरी शहर विकास आघाडीचे गटनेते प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, विवेक कुलकर्णी, डॉ. गणेश बंदसोडे, निलेश गायकवाड,दत्तात्रय जाधव, काकासाहेब देशमुख, भास्करराव कराटे,साजन पगारे यांच्या सहकार्याने सुरु झाले.

- Advertisement -

हे औषधे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे प्रमाणित असून त्याचे अतिशय चांगले परिणाम या कोरोना संकटप्रसंगी दिसून आल्याने संपुर्ण दिंडोरी शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत टॅब्लेटस मकवेल कंपनीच्या सहकार्याने उपलब्ध करून दिले आहे.

सर्व नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून संक्रमणापासुन सुरक्षित रहाण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रभावी ठरलेल्या या होमिओपॅथी च्या औषधांना आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेले असून त्याचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे.

या औषधांचा डोस घेणा-या नागरिकांना एक महिन्यानंतर पुन्हा एकदा घ्यावा लागणारा डोस देखील कंपनी मार्फत मोफत उपलब्ध होणार आहे.तथापि एवढ्यातच मोठ्या प्रमाणावर संपुर्ण नगरपंचायत क्षेत्रातील सर्वच नागरिकांसाठी मोफत टॅब्लेटस उपलब्ध करण्याचे महाराष्ट्रातील हे पहिलेच उदाहरण असावे.

दिंडोरी नगरपंचायत चे नगरसेवक तुषार मधुकर वाघमारे यांच्या प्रयत्नांतून व गटनेते प्रमोद देशमुख यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे एक अतिशय चांगला ऊपक्रम दिंडोरीतील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षीततेसाठी राबवण्यात येत असल्याने सर्व नागरिकांकडून ह्या सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.

सदर उपक्रम प्रगतीपथावर असून प्रभाग क्रमांक ११ मधील संशयित रुग्ण असल्याने तेथून ऊपक्रमांस सुरुवात करत.. एकानंतर एक शहरातील सर्व नागरिकांना औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याची माहिती गटनेते प्रमोद देशमुख यांनी दिली. सर्व नागरिकांनी सतर्क रहावे व लॉकडाऊन चे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सर्व उपस्थितांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या