उमराळे बु.परिसरात बिबट्याची दहशत

0
उमराळे बु.|वार्ताहर दिंडोरी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील उमराळे बु.परिसरात बिबट्याच्या होणार्‍या हल्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
उमराळे बु.परिसर हा द्राक्ष, उसामूळे सदाहरित असणारा भाग आहे. वाघाड धरण व नाळेगांव धरण बेडकाई माता परिसरात बिबट्याला लपण्यास जागा  मिळाल्याने बिबट्याचा संचार वाढला आहे.
बिबट्याचे पाळीव जनावरांवर व कुत्र्यांवरील हल्ल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. वासरे ,गाई, कुत्रे यांच्यावर बिबट्याचा हल्ले होत असतांना वन विभाग पंचनामा करुन नुकसान भरपाई देईल. मात्र बिबट्याला पकडण्यास यश आले नाही.
काल उमराळे बु येथे दुपारी रमेश आण्णा थेटे यांच्या द्राक्ष बागेत बिबट्या बसलेल्या अवस्थेत गणेश थेटे या शेतकर्‍याने पाहिला. त्यांनी ही माहिती उपसरपंच अशोक धात्रक, शशिभाऊ गामणे , वनविभागाचे कर्मचार्‍यांना दिली. शेतकर्‍यांची गर्दी वाढल्यानंतर बिबट्याने ते्थुन पळ काढला.
उमराळे बु. परिसरात दोन ते तीन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी रात्र दिवस फिरणे मुश्कील झाले आहे.तरी वनविभागाने त्वरित उपाय योजना करुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*