Friday, April 26, 2024
Homeनाशिकदिंडोरी : बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

दिंडोरी : बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

नाशिक | प्रतिनिधी 

दिंडोरी तालुक्यातील हस्तेदुमाला-हनुमंतपाडा येथे आज (ता.७) पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्लयात एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

दामू दगडू गायकवाड (४०) असे बिबट्याच्या हल्लयात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दामू गायकवाड हे मंगळवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शेतात जात असताना, जवळच दबा धरून असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

यात त्याच्याशी झटापटीमध्ये त्यांच्या डोके, कान, चेहरा, हाताला दुखापत झाली आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या