Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी डिंपल शेवाळे हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

Share

लोहोणेर | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या डिझाईन फॉर चेंज या उपक्रमांतर्गत नदी-नाले यांचे होणारे प्रदूर्षण या विषयावर देवळा तालुक्यातील लोहोणेर शिवारातील खालप फाटा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी डिंपल केदा शेवाळे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राची दखल घेत शाळेच्या विद्यार्थ्याचे या समस्यावर कार्यवाही करण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनाबद्दल अभिनंदन केले आहे.

डिझाईन फॉर चेंज या शिक्षण विभागाने राबविलेल्या अभिनव उपक्रमाला गेल्या वर्षापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरवात झाली आहे. त्यात व्यक्तिगत, सार्वजनिक, शैक्षणिक, सामाजिक वा कोणत्याही प्रश्नावर जी समस्या असेल त्यावर शिक्षक विद्यार्थी एकत्र बसून चर्चा करतात, त्याचे समाधान कारक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाने या समस्यांचा आप आपल्या परीने अभ्यास करून त्याचे उत्तर शोधावे व सर्वांनी एकत्र बसून त्याची सविस्तर चर्चा करून अनुभव कथन करावे व त्याचे एकत्रित सादरीकरण करून समस्या सोडवावी असा या उपक्रमा मागचा प्रामाणिक हेतू आहे.

लोहोणेर येथील खालपफाटा जि. प. शाळेने नद्यांच्या स्वच्छतेचा प्रकल्प हाती घेतला आहे . त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून संपूर्ण देशातील नद्या कशा स्वच्छ करता येतील यासाठी विद्यार्थिनी डिंपल केदा शेवाळे हिने या संदर्भात पंतप्रधान कार्यालय व भारताच्या राष्ट्रपती यांना पत्र लिहुन कार्यवाहीसाठी विनंती केली होती.

लोहोणेर शाळेच्या डिंपल शेवाळे या विध्यार्थिनीची रास्त मागणीचा पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असुन डिंपल व शाळेच्या मुखाध्यापिका पुष्पा गुंजाळ व डिझाईन फॉर चेंजच्या प्रकल्प समन्वयक उपशिक्षिका श्रीमती वैशाली सुर्यवंशी यांचे या अभिनव उपक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवुन नदी स्वच्छता या विषयावर सविस्तरपणे कार्य करण्याच्या सुचना केल्या आहेत.

नदी स्वच्छतेसाठी मी सुचवलेल्या उपाययोजनेवर पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी दखल घेत माझे कौतुक केले याचा मला खूप आनंद झाला आहे.या पुढे स्वच्छता ही सेवा यासाठी मी काम करेन. – डिंपल केदा शेवाळे, विद्यार्थिनी.

डिझाईन फॉर चेंज या शिक्षण विभागाने राबविलेल्या अभिनव उपक्रमाला गेल्या वर्षापासून जिल्ह्यात सुरवात झाली.त्याचे चांगले फलित येत असल्याने चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनां ह्या उपक्रमात सहभाग नोंदायला लावला. – डॉ. वैशाली झणकर,शिक्षणाधिकारी.

देवळा गटातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनीने नदी स्च्छता संदर्भात राबवायच्या उपाययोजनेची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याने या चिमुरडीचा अभिमान वाटला.- सुनिता धनगर,गटशिक्षणांधिकारी देवळा.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!