Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर : डॉ.पंकज आशिया

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर : डॉ.पंकज आशिया

विस्तार अधिकाऱ्यांसह दहा प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती

मालेगाव । प्रतिनिधी

- Advertisement -

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता करोना बाधित आणि संशयित व्यक्तींचं जिओ मॅपिंग होणार आहे. यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून सरकारकडून ‘महाकवच’ या नव्या मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. ‘महाकवच’ या ॲपचे दोन मुख्य वैशिष्ट्ये आहे.

पहिले म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि दुसरे क्वारेंटाइन ट्रॅकिंग आहे. महाकवच ॲपमुळे माहिती अचूक आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता हा डिजिटल प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी मालेगाव शहरात करण्यात येणार असून त्यासाठी विस्तार अधिकारी यांच्यासह प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया यांनी निर्गमीत केले आहेत.

या ॲपच्या सहाय्याने बाधित व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येणार आहे. या ॲपच्या आधारे ती व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. तसेच अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती, याचे ट्रेसिंगही महाकवच अॅपमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे.

त्याच प्रमाणे परदेशातून आलेली व्यक्ती किंवा संशयित रुग्ण यांनी किमान १४ दिवस स्वतःचे विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणे अतिशय आवश्यक असते. पण, बऱ्याचदा लोक निष्काळजीपणा दाखवतात. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत जातो.

पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच ॲप इनस्टॉल केले जाईल, तेव्हा अशा व्यक्तींचे क्वारंन्टाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. मालेगाव शहरातील कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या डिजीटल प्लॅटफॉर्मचा नक्कीच फायदा होईल असेही डॉ.आशिया यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या